केसांचे सौंदर्य असो किंवा त्वचेची काळजी, 'खोबरेल तेल' (Coconut Oil) हे आपल्या प्रत्येकाच्याच घरात हमखास असतंच. पण आजकाल बाजारात मिळणाऱ्या तेलांमध्ये अनेकदा सुगंधासाठी केमिकल्स किंवा भेसळ असते, ज्याचा आपले केस, त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. आपल्याकडे सणासुदीला किंवा पूजेसाठी नारळ फार मोठ्या प्रमाणावर विकत आणले जातात आणि अनेकदा खूप जास्त प्रमाणांत शिल्लक देखील राहतात. मग याच शिल्लक राहिलेल्या नारळापासून आपण घरीच शुद्ध, सुगंधी खोबरेल तेल तयार करू शकतो(how to make pure coconut oil at home).
घरच्या घरी 'व्हर्जिन कोकोनट ऑईल' तयार करण्याची ही पारंपारिक पद्धत अत्यंत सोपी आहे. विशेषतः उन्हाळ्यात शिल्लक उरलेला नारळ लवकर खराब होण्याची शक्यता असते. परंतु याच शिल्लक राहिलेल्या नारळापासून आपण घरच्याघरी शुद्ध आणि नैसर्गिक खोबरेल तेल तयार करू शकतो. केमिकल-फ्री आणि पूर्णपणे घरगुती पद्धतीने तयार केलेले हे तेल (how to make organic coconut oil from dry coconut in mixer) केस आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. शिल्लक राहिलेल्या नारळापासून तेल काढण्यासाठी नेमकं करायचं काय ते पाहूयात...
शिल्लक राहिलेल्या नारळापासून तेल शुद्ध खोबरेल तेल कसं काढायचं ?
१. सर्वात आधी वाळलेल्या नारळांना फोडून त्यांचे छोटे-छोटे तुकडे करून घ्या. नारळाचे तुकडे छोटे असणे गरजेचे आहे, कारण यामुळे मिक्सरवर जास्त ताण येणार नाही. तुकडे जितके लहान असतील, तितका ताण कमी होत जाईल. आता या तुकड्यांना एका मोठ्या भांड्यात पाण्यात टाकून साधारण २ तासांसाठी सोडून द्या. पाण्यात भिजवल्यामुळे खोबर मऊ होते, ज्यामुळे त्यातून दूध काढणे खूप सोपे जाते.
२. आता भिजवलेले नारळाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाका. यामध्ये गरजेनुसार पाणी मिसळा आणि मिक्सरमध्ये वाटून त्याची एकदम बारीक आणि स्मूद पेस्ट तयार करून घ्या.
अर्धा उरलेला नारळ उन्हाळ्यातही राहील एकदम फ्रेश! फ्रिजशिवाय १० दिवस टिकवण्याच्या खास घरगुती टिप्स...
३. जेव्हा नारळ व्यवस्थित वाटून होईल, तेव्हा एक मलमलचे स्वच्छ कापड घ्या आणि त्यामध्ये ही पेस्ट ओतून पिळून घ्या. जो पांढरा घट्ट द्रव बाहेर पडेल, तेच नारळाचे दूध असेल.
४. दूध काढल्यानंतर जो चोथा उरतो, तो फेकून देऊ नका. तो उन्हात वाळवून तुम्ही चटणी, ग्रेव्ही किंवा मिठाईमध्ये 'डेसिकेटेड कोकोनट' म्हणून वापरू शकता.
महागड्या साडीवर पडलेला डाग काढण्याची भन्नाट युक्ती, ड्रायक्लिनिंगची गरज नाही-१ पैशाचा खर्च नाही...
५. आता नारळाच्या दुधाला एका खोलगट भांड्यात ओतून झाकून ठेवा. १२ ते १५ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या. थंडाव्यामुळे नारळाची मलई वर साचेल आणि पाणी खाली राहील.
६. दुसऱ्या दिवशी, वर साचलेला घट्ट पांढरा थर अतिशय काळजीपूर्वक चमच्याच्या मदतीने काढून घ्या. याच भागापासून शुद्ध खोबरेल तेल तयार केले जाते.
७. आता या घट्ट मलईला एका जाड पृष्ठभागाच्या कढईत ओता आणि मध्यम आचेवर गरम करा. जसजशी मलई गरम होईल, तसतशी ती वितळू लागेल. या दरम्यान मिश्रण अधून - मधून ढवळत राहा जेणेकरून ते तळाला चिकटणार नाही.
८. साधारण ४५ ते ६० मिनिटांत तुम्हाला दिसेल की दुधाचा घट्ट भाग गोल्डन - ब्राऊन रंगाचा होऊन खाली बसतो आणि वर पारदर्शक, सुगंधी तेल तरंगू लागते.
९. जेव्हा तेल पूर्णपणे वेगळे होईल, तेव्हा गॅस बंद करा. तेल थोडं थंड झाल्यावर ते मलमलच्या कापडाने किंवा बारीक गाळणीने गाळून वेगळं करून घ्या.
१०. तयार नारळ तेल काचेच्या कोरड्या बाटलीत साठवून ठेवा. कारण यात कोणतेही केमिकल नसते, त्यामुळे यामध्ये ओला चमचा किंवा पाण्याचा थेंब जाऊ देऊ नका याची काळजी घ्या. हे तेल तुमची त्वचा, केस आणि अगदी स्वयंपाकासाठीही बाजारात विकत मिळणाऱ्या खोबरेल तेलापेक्षा अधिक फायदेशीर ठरते.
Web Summary : Make pure coconut oil at home from leftover coconuts. This simple, traditional method creates chemical-free oil perfect for hair and skin. Use it for cooking too!
Web Summary : बचे हुए नारियल से घर पर शुद्ध नारियल तेल बनाएं। यह सरल, पारंपरिक विधि बालों और त्वचा के लिए एकदम सही केमिकल-मुक्त तेल बनाती है। इसे खाना पकाने के लिए भी इस्तेमाल करें!