DIY Mosquito Repellent: जसजसं तापमान वाढत आहे डासांचा त्रास सुरू होतोय. उन्हाळ्यात डासांना वाढ होण्यासाठी पुरक वातावरण असतं. रात्र असो वा दिवस डासांचा त्रास सुरूच राहतो. ज्यामुळे आजारांचा धोका तर वाढतोच, सोबतच झोपेचं खोबरंही होतं. लोक डासांचा त्रास कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. केमिकल असलेल्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. जे नुकसानकारक असतात. अशात काही नॅचरल उपाय करूनही तुम्ही डासांना घरापासून दूर ठेवू शकता. खोबऱ्याच्या तेलाच्या मदतीनं तुम्ही डास पळवून लावू शकता.
कसं बनवाल नॅचरल औषध?
यासाठी एक डास मारणाऱ्या लिक्विड रिकामी बॉटल घ्या. थोडं खोबऱ्याचं तेल घ्या. सोबतच कापराचे काही तुकडे घ्या. आता रिफिलचं झाकण वरून उघडा. त्यात थोडं खोबऱ्याचं तेल टाका. तेल टाकल्यावर कापराचे काही तुकडे बारीक करून टाका आणि चांगलं मिक्स करा. रिफिलचं झाकण बंद करा. आता ही रिफिल मॉस्किटो रेपेलेंट मशीनमध्ये लावा आणि मशीन ऑन करा. हे मशीन रात्रभर लावून ठेवल्यास डास जवळही येणार नाही.
कडूलिंब आणि खोबऱ्याच्या तेलाचा स्प्रे
डासांना कडूलिंबाच्या तेला गंध अजिबात आवडत नाही. अशात तुम्ही घरीच कडूलिंबाच्या तेलाचा स्प्रे बनवू शकता. यासाठी बाजारातून कडूलिंबाचं तेल आणा आणि एक स्प्रे बॉटल आणा. यात थोडं कडूलिंबाचं तेल टाका. नंतर यात थोडं खोबऱ्याचं तेल टाका. वरून थोडा कापरू टाका. या गोष्टी चांगल्या मिक्स करा. सायंकाळी हे मिश्रण स्प्रे केल्यास घरातील सगळे डास पळून जातील.
लिंबू आणि कापराचा वापर
एक लिंबू घ्या आणि ते अर्ध कापा. अर्ध्या कापलेल्या लिंबामध्ये तीन ते चार लवंग टोचून ठेवा. हे लिंबू घरात एका कोपऱ्यात ठेवा. याच्या गंधानं डास रूममधून पळून जातील. त्यासोबतच कापराच्या गंधानं सुद्धा डास दूर पळतात. कापराचे काही तुकडे जाळून रूमचा दरवाजा बंद करा. असं केल्यास डास पळून जातील.