How to make cleaning liquid: घराची साफ-सफाई करणं अनेकांना आवडतं. घरातील वस्तू, भांडी स्वच्छ करण्यासाठी लोक बाजारातून महागडे क्लीनिंग लिक्विड आणतात. पण जर आपल्याला नेहमीच स्वच्छतेची आवड असेल आणि कमी खर्चात करायची असेल तर हा सोपा हॅक नक्की करून पाहा. आज आपण घरच्या घरी क्लीनिंग लिक्विड कसं बनवायचं, ते अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. या क्लीनिंग लिक्विडच्या मदतीने काही मिनिटांतच घरातील साफ-सफाई करता येते. वेगवेगळ्या वस्तूंवर साचलेली धूळ, माती आणि घाण लगेच काढून टाकण्यासाठी हे लिक्विड उपयोगी ठरतं.
लिंबाचा वापर
बाजारात मिळणाऱ्या अनेक क्लीनिंग लिक्विडमध्ये लिंबू वापरलेलं असतं. अशात घरीच हे क्लीनिंग लिक्विड बनवण्यासाठी ना जास्त वेळ लागतो, ना जास्त साहित्य. घरच्या घरी नैसर्गिक क्लीनिंग लिक्विड तयार करू शकता. यासाठी तुम्हाला अर्धा लिंबू, एक वाटी पाणी, २ चमचे व्हाईट व्हिनेगर, २ चमचे बेकिंग सोडा आणि कॉटनचे कापड लागेल.
नैसर्गिक क्लीनिंग लिक्विड कसं बनवायचं
सर्वात आधी एक वाटी पाणी घ्या. त्यात बेकिंग सोडा मिसळा. त्यानंतर या मिश्रणात व्हाईट व्हिनेगर घाला. शेवटी अर्धा लिंबू पिळून त्याचा रस या मिश्रणात मिसळा. आपलं होममेड नॅचरल क्लीनिंग लिक्विड तयार आहे. हे लिक्विड कोणत्याही स्प्रे बाटलीत भरून वापरू शकता.
अनेक वस्तू स्वच्छ करा
या क्लीनिंग लिक्विडचा वापर बाथरूमच्या आरशांवर लागलेले पाण्याचे डाग काढण्यासाठी करता येतो. खिडक्यांची काचही यामुळे सहज स्वच्छ होते. टेबल, खुर्च्या साफ करण्यासाठीही हे लिक्विड उपयुक्त आहे. ट्रॉली बॅग स्वच्छ करण्यासाठी कॉटनच्या कापडावर थोडं क्लीनिंग लिक्विड घ्या, कापड पिळून घ्या आणि ट्रॉली बॅग घासून साफ करा. काही वेळातच तुमची ट्रॉली बॅग अगदी नव्यासारखी दिसू लागेल.
