Join us
Daily Top 2Weekly Top 5

थंडीसाठी खास ट्रिक, घरातल्या पाण्याच्या टाकीतलं पाणी राहील गरम-सकाळी गारठणार नाहीत हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:28 IST

How To Keep Tank Water Hot In Winter : टाकीतलं पाणी पूर्ण दिवस गरम ठेवण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. ज्यामुळे टाकीतलं पाणी गरम राहण्यास मदत होईल

थंडीच्या दिवसांत टाकीच्या पाण्यानं अंघोळ करणं खूपच  त्रासदायक वाटतं. वातावरणातील गारव्यामुळे टाकीतलं पाणी खूपच थंड होतं. बरेच लोक थंड पाणी गरम करण्यासाठी गिजर किंवा इलेक्ट्रिक रॉडचा वापर करतात पण ते महाग पडते आणि वीजबीलही त्यामुळे जास्त येतं. (How To Keep Tank Water Hot).  काही सोप्या ट्रिक्स फॉलो करून तुम्ही टाकीतलं पाणी गरम ठेवू शकता. यासाठी तुम्हाला काही खास टिप्स फॉलो कराव्या लागतील. टाकीतलं पाणी पूर्ण दिवस गरम ठेवण्यासाठी तु्म्ही काही टिप्स फॉलो करू शकता. ज्यामुळे टाकीतलं पाणी गरम राहण्यास मदत होईल. (How To Keep Tank Water Hot In Winter Easy Tips And Tricks)

थर्माकॉल शीट

टाकीतलं पाणी गरम ठेवण्यासाठी थर्माकॉल थीटचा वापर करू शकता. थर्माकॉल शीट एक उत्तम इंसुलेटर असते. ज्यामुळे पाण्याची उष्णता कमी होत नाही. थर्माकॉल शीटमुळे टाकी भरल्यानंतर पाण्याचं तापमान जसं असतं तसंच बराचवेळ राहतं. पाणी जास्त गार होत नाही. 

रात्री झोपताना दुधात हा पदार्थ मिसळून प्या; चेहऱ्यावर ग्लो येईल-झोपही शांत लागेल, ५ फायदे

बबल रॅप

बबल रॅपच्या मदतीनं तुम्ही टाकीचं पाणी गरम ठेवू शकता. यासाठी टाकी पूर्णपणे कव्हर करा. बबल रॅपमधील हवा पाण्याला थंड होण्यापासून रोखते. यामुळे टाकीतलं पाणी सकाळीसुद्धा गरम राहतं. 

डार्क रंगाचा पेंट

हिवाळ्याच्या दिवसांत टाकीतलं पाणी गरम ठेवण्यासाठी तुम्ही डार्क रंग देऊ शकता. यासाठी छतावर वॉटर हिटर लावून टाकीला जोडा यामुळे पाणी गरम राहण्यास मदत होईल. हिवाळ्यात हा उपाय सर्वात प्रभावी आणि उत्तम ठरेल. ज्यामुळे वीजबील वाचवण्यासही मदत होईल.

२ ग्रॅम सोन्यात घ्या नाजूक, आकर्षक कानातले; १० लाईटवेट डिजाईन्स, रोज वापरायला उत्तम पर्याय

पाईपलाईन कव्हर करा

बरेच लोक टाकी झाकतात पण पाईप उघडाच ठेवतात. थंड हवेमुळे पाईप थंड होतात त्याच बरोबरच पाईपसुद्धा थंड होतो. अशा स्थितीत फोम इंसुलेशनं पाईप कव्हर करा किंवा जुनं कापड लपेटून घ्या. टाकीतून नळापर्यंत येणारे पाईप्स देखील थंड वाऱ्यामुळे लवकर थंड होतात. त्यामुळे पाईप्सलाही फोम इन्सुलेशन लावा. शक्य असल्यास, टाकी पूर्णपणे बाहेर न ठेवता छताच्या आतील बाजूस किंवा भिंतींच्या जवळ ठेवा, जिथे थेट थंड वाऱ्याचा किंवा रात्रीच्या वातावरणाचा कमी परिणाम होईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Keep Tank Water Hot: 4 Easy Tricks for Winter

Web Summary : Avoid chilly tank water this winter! Use thermocol sheets, bubble wrap, dark paint, and insulate pipes to maintain warmth effectively and save on electricity bills. Simple tricks for a warm water supply.
टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया