Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरात नेहमीच खूप पसारा असतो? 'हे' छोटे बदल करून पाहा- घर नेहमीच दिसेल स्वच्छ, टापटीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2026 17:12 IST

How to Keep Home Always Neat and Clean?: घरातला पसारा कमी करून घर आवरलेलं, स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे सांगितलेल्या काही गोष्टी करून पाहा..

काही जणांच्या घरात गेल्यावर असं वाटतं की या घरात कोणी राहातं की नाही किंवा या घरात माणसांचा वावर आहे की नाही... कारण त्यांचं घर अतिशय व्यवस्थित, नीटनेटकं आणि स्वच्छ असतं. घरातली प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे ठेवलेली असते. अशी स्वच्छ, टापटीप घरं पाहिली की या लोकांना घर इतकं नेटकं ठेवणं कसं जमतं हा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी त्या घरातली मुख्य स्त्री आणि घरातले इतर लोक नक्कीच थोडी जास्त मेहनत घेतात आणि काही साध्या सोप्या गोष्टी सगळेच जण पाळतात (home cleaning tips). त्यामुळे मग त्यांचं घर नेहमीच व्यवस्थित आवरलेलं, स्वच्छ दिसतं. हे लोक असं काय नेमकं वेगळं करतात ते पाहा...(how to keep home always neat and clean?)

घरातला पसारा कमी करण्यासाठी टिप्स

 

१. घरातल्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी मोठे मोठे बास्केट खरेदी करा. उदारहणार्थ लहान मुलांची खेळणी, कपडे, रुमाल, टाॅवेल, सॉक्स असे लहान कपडे यांच्यासाठी त्यांच्या आकारानुसार झाकण असलेले बास्केट खरेदी करा. जी ती वस्तू, ज्या त्या बॉक्समध्येच टाकायची अशी शिस्त घरातल्या लहान मुलांसकट सगळ्यांना लावा. यामुळे वस्तू इकडेतिकडे फेकल्या जाणार नाहीत. त्या त्या बास्केटमध्ये त्या जमा राहतील.

शरीरात होणारे 'हे' बदल सांगतात तुम्हाला लवकरच डायबिटीस होणार... दुर्लक्ष कराल तर आयुष्यभर पस्तावाल.. 

२. कपाटांमध्ये कपड्यांसाठी ऑर्गनायझर आणून ठेवा. जे ते कपडे ज्या त्या ऑर्गनायजरमध्ये ठेवत जा. त्यामुळे एकेक ऑर्गनायझर काढून तुम्ही त्यातले कपडे तुमच्या सवडीनुसार आवरू शकता. यामुळे काम सोपं आणि झटपट होतं.

 

३. घरात जास्तीच्या वस्तू मुळीच घेऊ नका. यामुळे गरज नसतानाही खूप जागा अडली जाते. कोणतीही वस्तू घेण्यापुर्वी त्याची खरच गरज आहे का आणि ती वस्तू ठेवण्यासाठी घरात जागा आहे का हे प्रश्न स्वत:ला विचारा. यामुळे पैसेही विनाकारण खर्च होणार नाहीत अणि घरातही पसारा दिसणार नाही. 

काळे की पांढरे- हिवाळ्यात कोणते तीळ खाणं जास्त फायद्याचं? तीळ खाताना लक्षात घ्या १ महत्त्वाची गोष्ट 

४. घराचा हॉल नेहमी सुटसुटीत मोकळा ठेवा. तिथे विनाकारण कोणतीही वस्तू ठेवू नका. ज्यांची गरज आहे त्याच वस्तू फक्त हॉलमध्ये दिसायला हव्या. 

५. स्वयंपाक घर, गॅस, किचन ओटा, डायनिंग टेबल आणि सिंक नेहमीच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण या ठिकाणी जर राडा असेल तर तुमचं स्वयंपाक घर घाण, अस्वच्छ दिसतं. त्यामुळे ही कामं झालीच पाहिजेत अशी शिस्त स्वत:ला लावूनच घ्या.  

English
हिंदी सारांश
Web Title : Simple Home Cleaning Tips for a Tidy, Organized Space

Web Summary : Keep your home neat with these simple tips: Use baskets for storage, organize cupboards, avoid unnecessary items, keep the hall clutter-free, and maintain a clean kitchen. A tidy home is easily achievable with consistent effort.
टॅग्स :स्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजनसोशल व्हायरलकिचन टिप्स