Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात माठातलं पाणी होईल बर्फासारखं थंड, २ टिप्स - गारेगार पाण्यासाठी पारंपरिक पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2026 09:30 IST

Why is pot water not cooling? Reasons and solutions: Natural water cooler: Clay pot cooling tips: माठातील पाणी अगदी नैसर्गिकरीत्या थंड करण्याच्या काही सोप्या आणि असरदार टिप्स.

कडाक्याच्या उन्हात बाहेरुन आल्यावर फ्रिजमधील थंडगार पाणी पिण्याची ओढ सगळ्यांनाच लागते. पण फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने घसा बसणे, दात दुखणे किंवा पचनाच्या समस्या निर्माण होतात. अशावेळी नॅचरल कुलर म्हणजेच मातीचा माठ हा सगळ्यात उत्तम पर्याय ठरतो. माठातील पाणी फक्त थंडच नसते. तर ते आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी मानलं जातं. अनेकांची तक्रार असते की कडाक्याच्या उन्हात माठातील पाणी हवे तसे थंड होत नाही. फ्रिजच्या पाण्यासारखे चिल्ड वॉटर पिता येत नाही.माठातील पाणी थंड होण्यामागे एक शास्त्रीय प्रक्रिया आहे, जिला 'बाष्पीभवन' (Evaporation) म्हणतात. पण माठातील पाणी थंड होण्यासाठी काही जुन्या आणि पारंपरिक पद्धतीचा वापर केला तर भर उन्हाळ्यातही माठातील पाणी बर्फासारखे थंडगार होऊ शकते. माठातील पाणी अगदी नैसर्गिकरीत्या थंड करण्याच्या काही सोप्या आणि असरदार टिप्स.

जिममध्ये जाऊनही पोटावरची- मांड्यांवरची चरबी कमी होत नाही? १५ मिनिटे करा 'हा' स्मार्ट वर्कआउट, कॅलरी बर्न होतील वेगानं

ओले सुती कापड गुंडाळणे ही सर्वात जुनी आणि प्रभावी पद्धत आहे. माठाच्या भोवती जाड सुती कापड किंवा पोते ओले करुन गुंडाळा. हे कापड जसे वाळेल, तसे ते माठातील उष्णता शोषून घेते आणि बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होते. यामुळे माठातील पाणी फ्रिजच्या पाण्यासारखे थंड होते. हे सुती कापड सतत ओले करुन माठाला गुंडाळायला हवे. 

पाण्याचा माठ जमिनीवर किंवा स्टँडवर ठेवण्याऐवजी एका मोठ्या परातीत किंवा पाटीत वाळू भरा आणि ती वाळू ओली करा. या ओल्या वाळूवर माठ ठेवा. वाळूतील ओलावा माठाला खालून थंडावा देतो. ज्यामुळे पाणी थंडगार राहाते. 

पाण्याचा माठ नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे हवा खेळती राहिल. हवा जेवढी जास्त लागेल, तेवढे बाष्पीभवन वेगाने होईल आणि पाणी जास्त थंड होईल. 

नवीन माठ वापरणार असाल तर तो थेट वापरु नका. नवीन माठ हा किमान २४ तास पाण्यात पूर्णपणे बुडवून ठेवावा. यामुळे मातीच्या छिद्रांमधील हवा निघून जाते आणि माठ पाणी शोषून घेतो. यामुळे तो जास्त वेळ थंड राहतो. 

माठाच्या बाहेरील सूक्ष्म छिद्रे धुळीमुळे बंद होतात. जर छिद्रे बंद झाली, तर पाणी थंड होत नाही. त्यासाठी प्रत्येक आठवड्याला माठ बाहेरून हाताने किंवा मऊ कापडाने घासून स्वच्छ करावा. माठ घासण्यासाठी साबण किंवा डिटर्जंटचा वापर कधीही करू नका. 

English
हिंदी सारांश
Web Title : Keep earthen pot water ice cold this summer: 2 tips.

Web Summary : Earthen pots are natural coolers. For extra cooling, wrap the pot in wet cloth or place it on wet sand. Ensure good ventilation. Soak new pots for 24 hours before use. Clean weekly for best results.
टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्स