घरातल्या बाल्कनीत कबुतरांनी उच्छाद मांडलाय अशी तक्रार बऱ्याचजणांची असते. कबुतरांना दूर ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता (How To Get Rid Of Pigeons In Balcony). कबुतरं एकदा घरात किंवा बाल्कनीत शिरले तर विष्ठा पसरवतात. यामुळे दुर्गंध पसरतो, तसंच आजार होण्याचीही शक्यता असते. वरून बाल्कनीत जी घाण पसरते ती साफ करणंही कठीण होतं. म्हणूनच कबुतरांना दूर पळवण्यासाठी काही सोपे उपाय करायला हवेत. (How To Get Rid Of Pigeons In Balcony Naturally)
नायलॉनची जाळी
नायलॉनची जाळी कबुतरांना बाल्कनीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी हा सर्वात प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाय आहे. तुमच्या बाल्कनीच्या संपूर्ण उघड्या भागावर बारीक नायलॉनची जाळी बसवा. यामुळे कबुतरे आत येऊ शकत नाहीत आणि तुमच्या बाल्कनीत प्रवेश करणार नाहीत.
बर्ड स्पाईक
बाल्कनीचे कठडे, खिडकीचे कडे किंवा ए.सी. युनिटवर जेथे कबुतरे बसतात, तेथे बर्ड स्पाइक्स लावावेत. हे स्पाइक्स बोथट असतात, त्यामुळे कबुतरांना इजा न होता, त्यांना त्या जागेवर बसणे असह्य होते.
चमकदार वस्तू
कबुतरांना चमकदार वस्तूंची भीती वाटते आणि त्यांचे परावर्तन त्यांना त्रासदायक ठरते. बाल्कनीत जुन्या सीडी, ॲल्युमिनियम फॉइलचे तुकडे किंवा चमकदार रिबन हवेत लटकवा.
बनावट शिकारी पक्षी
घुबड किंवा गरुड यांसारख्या त्यांच्या नैसर्गिक शत्रूंचे प्लॅस्टिकचे मॉडेल बाल्कनीत ठेवा. कबुतरांना सततचा धोका जाणवून ते तिथे बसणे टाळतात. मात्र, कबुतरांना सवय होऊ नये म्हणून हे मॉडेल वेळोवेळी जागा बदलून ठेवावेत. बाल्कनीत विंड चाइम लावा. हवेमुळे होणाऱ्या त्यांच्या अचानक आणि सततच्या आवाजाने कबुतरांना शांतता भंग झाल्यामुळे ती जागा सोडून जावी लागते
सुगंधित स्प्रे
कबुतरांना तीव्र वास आवडत नाही. व्हिनेगर , काळी मिरी पावडर किंवा लसूण यांचा स्प्रे बाल्कनीतील कठड्यांवर आणि कोपऱ्यात फवारल्यास कबुतरे दूर राहतात.कबुतरांना सुरक्षित आणि घाणेरडे ठिकाण घरटे बनवण्यासाठी आवडते. बाल्कनी नेहमी स्वच्छ आणि कोरडी ठेवा. विष्ठा आणि घरट्यांचे साहित्य त्वरित काढा. कबुतरांना दूर ठेवण्यासाठी, केवळ एका उपायावर अवलंबून न राहता, जाळी, चमकदार वस्तू आणि स्वच्छता या उपायांचा एकत्रितपणे वापर केल्यास तुम्हाला निश्चितच चांगले परिणाम मिळतील.
Web Summary : Pigeons create mess and spread diseases in balconies. Use nylon nets, bird spikes, shiny objects, fake predators, and scented sprays to deter them. Keeping the balcony clean helps prevent pigeons.
Web Summary : कबूतर बालकनी में गंदगी करते हैं और बीमारियाँ फैलाते हैं। उन्हें रोकने के लिए नायलॉन के जाल, बर्ड स्पाइक्स, चमकदार वस्तुएं, नकली शिकारी और सुगंधित स्प्रे का उपयोग करें। बालकनी को साफ रखने से कबूतरों को रोकने में मदद मिलती है।