Get rid of mosquitoes : जर तुम्ही डासांना वैतागले असाल तर तुमची चिंता आता सहजपणे दूर होऊ शकते. कन्टेन्ट क्रिएटर शिप्रा राय यानी डासांना पळवून लावण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. त्यानी कांदा आणि मिठानं डास पळवण्याची एक ट्रिक सांगितली आहे. कांदा आणि मीठ या गोष्टी सहजपणे प्रत्येक घरात मिळतात. त्यामुळे तुम्हाला डास पळवण्यासाठी वेगळा काही खर्च करण्याची देखील गरज पडणार नाही.
कांदा आणि मीठ कसं करतं काम?
कांद्यामध्ये सल्फर नावाचं तत्व असतं, ज्याच्या तिखट गंध डासांना पसंत नसतो. तर मीठ या सल्फर तत्वाचा गंध वाढवण्याचं आणि हवेत पसरवण्याचं काम करतं. अशाप्रकारे कांदा आणि मिठाचा हा उपाय डासांना दूर ठेवण्यास मदत करतो.
कसा कराल उपाय?
शिप्रा राय यांची ही ट्रिक वापरण्यासाठी सगळ्यात आधी कांदा सोलून घ्या. कांद्याचे तुकडे न करता त्यावर कट मारा. आता कट मारलेल्या भागात मीठ भरा. डास जिथे जास्त येतात तिथे कांदा ठेवा.
दुसरा एक उपाय
एक मीडिअम आकाराचा कांद्या घ्या
दोन मोठे चमचे मीठ
स्प्रे बॉटलल
वाटी
कांदा मीठ टाकून सगळीकडे तर ठेवू शकता नाही. अशात हा दुसरा उपाय कामात येऊ शकतो. यासाठी कांदा सोडून बारीक कापा. त्यानंतर कांद्यांची पेस्ट करा. पेस्ट पिळून त्यातून कांद्या रस एका वाटीत जमा करा. यात १ ते २ मोठे चमचे मीठ टाकून मिक्स करा.
कसा कराल वापर?
कांद्याचा रस आणि मिठाच्या या मिश्रणात एक ग्लास पाणी टाका. डास पळवण्यासाठीचं मिश्रण तयार आहे. हे मिश्रण आता एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. सायंकाळी किंवा डास जास्त झाल्यावर हा स्प्रे घरातील कानाकोपऱ्यांमध्ये शिंपडा. कांद्याचा वासानं डास पळून जातील.