उंदरांमुळे (Mice Solution) रात्री येणारे कुरतडण्याचे आवाज, इकडे-तिकडे पडलेली विष्ठा आणि कपाटांमध्ये केलेली नासाडी, हे चित्र अनेक घरांमध्ये दिसते. घरात लहान मुलं असतील तर ती खूपच घाबरतात. उंदरांमुळे फक्त घरातील वस्तूंचेच नुकसान होत नाही, तर ते अनेक आजारही पसरवतात. त्यामुळे त्यांना वेळीच घरातून बाहेर काढायला हवं. उंदीर पकडायचा पिंजरा आणला तरी एखादा उंदीर त्यात कैद होतो. नंतर पुन्हा घरात उंदीर फिरू लागतात. (How Remedies To Remove Mice Fastest Way To Get Rid Of Mice)
बाजारात मिळणाऱ्या रासायनिक औषधांचा वापर करणे नेहमीच सुरक्षित नसते. घरात लहान मुलं असतील तर अजूनच जपावे लागते. काही सोपे आणि घरगुती उपाय वापरून तुम्ही कोणत्याही रसायनाचा वापर न करता उंदरांना कायमचे पळवून लावू शकता. हे उपाय प्रभावी तर आहेतच, पण तुमच्यासाठी पूर्णपणे सुरक्षित देखील आहेत. (How To Get Rid Of Mice At Home)
पुदिन्याचा वापर
पुदिन्याचा वास उंदरांना जराही आवडत नाही. पुदिन्याची पाने किंवा तेल घरात जिथे उंदीर जास्त दिसतात तिथे ठेवा. यामुळे ते त्या भागातून पळून जातील.
लवंग आणि कापराची कमाल
लवंग आणि कापूर दोन्हीचा वास उंदरांना सहन होत नाही. लवंग आणि कापराची छोटी पोतडी करून ती कपाटात, किचनमध्ये किंवा खिडकीजवळ ठेवा.
दुधावर जाडजूड साय येण्यासाठी पाहा दूध तापवण्याची खास ट्रिक, घरीच करा भरपूर साजूक तूप
लसूण आणि तिखट मिरचीची पेस्ट
लसूण आणि लाल तिखट मिरचीची पेस्ट एकत्र करून घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवा. याचा तिखट वास उंदरांना घरातून बाहेर काढेल.
सणासुधीला पांढरे केस नको? नारळाच्या तेलात 'हा' पदार्थ कालवून लावा, ५ मिनिटांत केस काळेभोर
कांद्याचा वास
कांद्याचा वास उंदरांसाठी खूप त्रासदायक असतो. कांद्याचे तुकडे उंदरांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर ठेवा.पण कांदा खराब झाल्यावर लगेच बदला अन्यथा त्यावर इतर किटक येऊ शकतात. कांद्याचा रस एका स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही भिंतींवर शिंपडू शकता.
डाळींब आणि फिनाईलचा स्प्रे
डाळींबाचे दाणे आणि थोडं फिनाईल एकत्र करून त्याचा स्प्रे उंदीर जिथून येतात त्या ठिकाणी मारा. याचा वास त्यांना घरात टिकू देणार नाही. हे सोपे उपाय वापरून तुम्ही तुमच्या घरातून उंदरांना कायमचं पळवून लावू शकता आणि आपलं घर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवू शकता. याशिवाय घरात खरकटं, अन्नपदार्थ पडलेले राहू देऊ नका. किचन स्वच्छ ठेवा जेणेकरून उंदीर येणं आपोआपच कमी होईल.