Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > घरभर झुरळांचं थैमान? २ रुपयांची ही पावडर घराच्या कोपऱ्यांत लावून ठेवा, झुरळं गायब

घरभर झुरळांचं थैमान? २ रुपयांची ही पावडर घराच्या कोपऱ्यांत लावून ठेवा, झुरळं गायब

How To Get Rid Of Cockroaches : 2 रुपयांची  पावडर झुरळांना पळवण्यासाठी  फायदेशीर ठरू शकते. हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पाहायला हवा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:57 IST2026-01-30T13:23:04+5:302026-01-30T15:57:38+5:30

How To Get Rid Of Cockroaches : 2 रुपयांची  पावडर झुरळांना पळवण्यासाठी  फायदेशीर ठरू शकते. हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पाहायला हवा.

How To Get Rid Of Cockroaches : Use These 2 Rupees Coffee Powder To | घरभर झुरळांचं थैमान? २ रुपयांची ही पावडर घराच्या कोपऱ्यांत लावून ठेवा, झुरळं गायब

घरभर झुरळांचं थैमान? २ रुपयांची ही पावडर घराच्या कोपऱ्यांत लावून ठेवा, झुरळं गायब

स्वंयपाकघरात फिरणारे झुरळं फक्त घाण पसरवत नाही तर अनेक आजारांचे कारणही ठरतात. आजकाल बरेच लोक महागडे स्प्रे, केमिकल्सचा वापर करतात तरिही झुरळं पुन्हा येतात. झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. फक्त २ रुपयांची  पावडर झुरळांना पळवण्यासाठी  फायदेशीर ठरू शकते. हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पाहायला हवा. (How To Get Rid Of Cockroaches)

कॉफी आणि साखरेचं मिश्रण

रक्षा भास्कर सांगतात की, हा उपाय अगदी सोपा आहे. किचनमध्ये उपलब्ध असलेली कॉफी पावडर एका वाटीत काढून घ्या. यात तुम्ही बारीक केलेली साखर मिसळू शकता. हे मिश्रण झुरळांसाठी एका विषाप्रमाणे काम करेल. ज्यामुळे झुरळं आपोआप कमी होण्यास मदत होईल.

झुरळांना गोड पदार्थ खूपच आवडतात. साखरेचा सुगंध झुरळांना कानाकोपऱ्यातून बाहेर काढण्यास मदत करतो. जेव्हा झुरळं साखर खाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा नकळत कॉफी पावडरही खातात. जे त्यांच्या सिस्टीमसाठी घातक ठरू शकतं.

कॉफी पावडरचा रंग आणि कॅफेनचा परिणाम

कॉफी पावडरचा रंग आणि सुगंध झुरळांच्या श्वसन प्रणालीवर परिणाम करतो. कॉफीमध्ये उपस्थित इतर तत्व झुरळांसाठी विषाप्रमाणे ठरतात. जेव्हा झुरळं हे मिश्रण खातात तेव्हा त्यांच्या शरीरात रासायनिक प्रतिक्रिया सुरू होते. ज्यामुळे झुरळं मरतात. हे मिश्रण अशा ठिकाणी लावा जिथे सर्वात जास्त  झुरळं येतात.  बाजारात मिळणारे केमिकल्सयुक्त स्प्रे महाग असतात. रक्षा भास्कर सांगतात की २ रुपयांत तुम्ही पूर्णपणे घर झुरळमुक्त करू सकता.

झुरळ वेगानं प्रजनन करतात. म्हणून वारंवार उपयोग केल्यानंतरही झुरळं नष्ट होत नाहीत. ही प्रक्रिया आठवड्यातून २ ते ३ वेळा करावी लागते. हळूहळू कॉकरॉच  या मिश्रणाच्या संपर्कात येऊन नष्ट होतात. याशिवाय बेकिंग सोडा आणि साखर एकत्र करून  घराच्या कोपऱ्यांमध्ये घातल्यास झुरळांच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. झुरळं प्रामुख्यानं अन्नांच्या कणांकडे आकर्षीक होतात त्यामुळे रात्री भांडी घासून ठेवा आणि ओटा नेहमी कोरडा, नीटनेटका ठेवणं सर्वात महत्वाचं आहे.

Web Title : कॉफी और चीनी के मिश्रण से तिलचट्टों का सफाया करें।

Web Summary : कॉफी और चीनी का मिश्रण तिलचट्टों को प्रभावी ढंग से खत्म करता है। चीनी उन्हें आकर्षित करती है, जबकि कॉफी उनके सिस्टम को जहर देती है, जिससे श्वसन बाधित होता है। तिलचट्टा-मुक्त घर के लिए साप्ताहिक रूप से दोहराएं; सतहों को साफ रखें।

Web Title : Eradicate cockroaches with a simple coffee and sugar mixture.

Web Summary : Coffee and sugar mixture effectively eliminates cockroaches. The sugar attracts them, while the coffee poisons their system, disrupting respiration. Repeat weekly for a cockroach-free home; keep surfaces clean.