Join us

घराच्या काना-कोपऱ्यातून पळून जातील सगळी झुरळं, एकदा करून बघाच 'हे' घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 10:19 IST

Cockroach Control Tricks: तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, घराच्या कानाकोपऱ्यात लपून बसलेले किंवा किचनमधील झुरळं घरातून बाहेर काढण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या तुमच्या किचनमध्येच असतात.

Cockroach Control:  उंदीर, डास, माश्या आणि झुरळं ही जवळपास सगळ्याच घरांमध्ये आढळतात. यातील झुरळांमुळे तर लोकांचं जगणं अवघड झालेलं असतं. कारण ते जागोजागी असतात. खासकरून किचनमध्ये झुरळ अधिक हैदोस घालतात. किचनमधील पदार्थ, फळं आणि भाज्यांवर ते फिरत असतात. त्यांवर घाणं करतात. ज्यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. मग हे किळसवाणे झुरळ घरातून पळवून लावणयासाठी वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर केला जातो. पण तरीही काही फरक दिसून येत नाही. कारण या केमिकल्सनं काही दिवस झुरळं गायब होतात आणि पुन्हा घरात येतात. अशात तुम्ही काही वेगळे घरगुती उपाय करून घरातील झुरळं पळवून लावू शकता. 

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, घराच्या कानाकोपऱ्यात लपून बसलेले किंवा किचनमधील झुरळं घरातून बाहेर काढण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या तुमच्या किचनमध्येच (Home Remedies to get rid of Cockroach Permanently) असतात. चला तर मग जाणून घेऊ झुरळं पळवून लावण्यासाठी काय घरगुती उपाय कराल.

झुरळं पळवून लावण्याचे उपाय

लिंबाचा रस

लिंबाच्या रसाचं मिश्रण झुरळं पळवून लावण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. यासाठी एका वाटीमध्ये लिंबाचा रस घ्या आणि हा रस अशा जागांवर शिंपडा जिथे जास्त झुरळं येतात. लिंबाच्या वासानं झुरळं पळून जातील.

तेजपत्ता

किचनमधील मसाल्यांमध्ये वापरला जाणारा तेजपत्ता सुद्धा झुरळं पळवण्यासाठी फायदेशीर ठरतो. यासाठी तेजपत्ते बारीक करून पावडर तयार करा. हे पावडर घरातील कानाकोपऱ्यात टाका. यानं तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.

बेकिंग पावडर आणि साखर

झुरळं घरातून पळवून लावण्यासाठी बेकिंग सोडा आणि साखरेचं मिश्रण खूप फायदेशीर ठरतं. यासाठी एका वाटीमध्ये समान प्रमाणात बेकिंग सोडा आणि साखर घ्या. यांचं मिश्रण तयार करून एका स्प्रे बॉटलमध्ये टाका. झुरळं येतात त्या जागांवर हे शिंपडा.

टॅग्स :स्वच्छता टिप्सहेल्थ टिप्ससोशल व्हायरल