Join us

शेगडीची फ्लेम कमी झालीय? ३ सोपे उपाय; वेळ वाचेल- होईल स्वयंपाक झरझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2023 19:19 IST

How To Fix A Low Flame Gas Stove Burner गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता सफाई करायला हवी

कामाच्या ऐन गडबडीत शेगडीच्या एखाद्या बर्नरची फ्लेम कमी झाली की खूप गोंधळ उडतो. स्वयंपाक करण्याचा वेग तर कमी होतोच, यासह दुसरी कामं देखील या एका गोष्टीमुळे खोळंबली जातात. घाईबडीच्या या जीवनात एक जरी वस्तू बिघडली तर, संपूर्ण कामं रखडतात. कामं रखडली की खूप वैताग येतो.

शेगडीच्या एखाद्या बर्नरची फ्लेम कमी झाली की, आपण बर्नर रिपेयर करणाऱ्या व्यक्तीला बोलावतो. यात आरामात ४ ते ५ तास वाया जातात. अशा वेळी काय करावं हे सुचत नाही. अशा परिस्थितीत आपण शेगडीच्या बर्नरची फ्लेम घरच्या घरी रिपेयर करू शकता. या काही टिप्समुळे कमी झालेली फ्लेम पुन्हा नव्यासारखी काम करेल(How To Fix A Low Flame Gas Stove Burner).

सर्वात आधी हे काम करा

शेगडीच्या बर्नरची फ्लेम कमी होत असेल तर, सर्वात आधी सिलेंडर रेग्युलेटर बंद करा आणि कनेक्शन डिस्कनेक्ट करा. सोबत पाईप बाहेर काढून बाजूला ठेवा.

चिप्सच्या पाकिटात हवा का भरलेली असते? चिप्स कमी, हवा जास्त...

बर्नरची सफाई करा

बर्नरची फ्लेम अनेकदा अन्न शिजवताना बंद पडते, किंवा कमी जळते. अशा परिस्थितीत अन्न शिजायला वेळ लागतो. त्यामुळे बर्नरच्या छिद्रांमध्ये काही अडकले तर नाही ना, याची तपासणी करून घ्या. त्यानंतर गरम पाण्यात बेकिंग सोडा मिसळून मिश्रण तयार करा. त्यात बर्नर काही वेळेसाठी ठेवा. नंतर टूथपिकच्या मदतीने प्रत्येक छिद्र स्वच्छ करा, शेवटी स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरडे करा.

गॅस पाईप तपासा

जर आपला गॅस पाईप ३ महिन्यांपेक्षा जुना असेल तर, गॅस पाईप आधी चेक करा. गॅस पाईप काही कालावधीनंतर खराब होतात. ज्यामुळे गॅस बर्नरपर्यंत योग्य प्रकारे पोहचत नाही. ज्यामुळे बर्नरमधील फ्लेम कमी जळते. अशा स्थितीत  गॅस पाईप नीट चेक करा.

नव्या झाडूमधून फार भुसा पडतो, घरभर पसरतो? २ टिप्स, नवा झाडू घेतला की नक्की वापरा..

स्टोव्ह उघडून स्वच्छ करा

बर्नर आणि गॅस पाईप तपासल्यानंतरही फ्लेम कमी येत असल्यास, ही समस्या त्याच्या इतर भागांमध्ये देखील असू शकते. अशा वेळी स्क्रू ड्रायव्हरसारख्या गोष्टींचा वापर करून शेगडी उघडून स्वच्छ करा. तरी देखील फ्लेम लो असेल तर, शेगडी रिपेयर करणाऱ्याला बोलावून शेगडी ठीक करा.

टॅग्स :किचन टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडिया