Lokmat Sakhi >Social Viral > होळीच्या दिवशी भेसळयुक्त मिठाई तर खात नाहीयेत ना? 'अशी' ओळखा बनावट मिठाई, सोप्या टिप्स पाहा

होळीच्या दिवशी भेसळयुक्त मिठाई तर खात नाहीयेत ना? 'अशी' ओळखा बनावट मिठाई, सोप्या टिप्स पाहा

How to identify synthetic mawa: Fake sweets during festivals: Tips to identify adulterated sweets: How to detect artificial mawa: Detecting fake khoya during Holi: Holi sweet safety tips: Synthetic mawa detection tricks: Fake sweets warning signs: How to check for pure mawa: Festive season food safety: होळीच्या दिवशी आपणही मिठाई खरेदी करणार असाल तर भेसळयुक्त मिठाई कशी ओळखायची ते पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2025 16:29 IST2025-03-10T16:28:00+5:302025-03-10T16:29:00+5:30

How to identify synthetic mawa: Fake sweets during festivals: Tips to identify adulterated sweets: How to detect artificial mawa: Detecting fake khoya during Holi: Holi sweet safety tips: Synthetic mawa detection tricks: Fake sweets warning signs: How to check for pure mawa: Festive season food safety: होळीच्या दिवशी आपणही मिठाई खरेदी करणार असाल तर भेसळयुक्त मिठाई कशी ओळखायची ते पाहूया.

how to find out fake adulterated sweets and synthetic mawa holi festive season simple hacks tips and tricks | होळीच्या दिवशी भेसळयुक्त मिठाई तर खात नाहीयेत ना? 'अशी' ओळखा बनावट मिठाई, सोप्या टिप्स पाहा

होळीच्या दिवशी भेसळयुक्त मिठाई तर खात नाहीयेत ना? 'अशी' ओळखा बनावट मिठाई, सोप्या टिप्स पाहा

होळीचा सण येण्यापूर्वीच बाजारात मिठाई, रंग, पिचकाऱ्या आपल्याला पाहायला मिळतात.(How to identify synthetic mawa) या काळात अनेक गोडाच्या पदार्थांची चव चाखायाला मिळते. थंडाई, लस्सी, पेढे, बर्फी, गुजिया, जिलेबीसारखे अनेक पदार्थ चवीने खातो. काही पदार्थांमध्ये माव्याचा देखील वापर केला जातो. (Fake sweets during festivals) अनेकदा मिठाई बनवताना अनेक भेसळयुक्त पदार्थ वापरले जातात, ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. (Tips to identify adulterated sweets)


होळीच्या दिवशी बाजारात मिठाई, गोडाच्या पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावेळी बनवाट किंवा भेसळयुक्त मिठाई किंवा माव्याची विक्री अधिक प्रमाणात होते.(How to detect artificial mawa) ज्यामुळे आपल्याला फूड इनफेक्शन होते. गोडाचे पदार्थ किंवा मिठाईशिवाय सणांची मज्जाच अपूर्ण असते.(Holi sweet safety tips) परंतु, सध्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होते. तूप आणि माव्याचा मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु, यामध्ये भेसळ केलेली असते. जर होळीच्या दिवशी आपणही मिठाई खरेदी करणार असाल तर भेसळयुक्त मिठाई कशी ओळखायची ते पाहूया. (Fake sweets warning signs)

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी करा बिना साखरचे ज्वारीचे मफिन्स, हेल्दी आणि पौष्टिकही, चवीला अगदी उत्तम

सणासुदीच्या काळात मिठाईला अधिक आकर्षक बनवण्यासाठी दुकानदार जास्त प्रमाणात रंग वापरतात. जे आपल्या आरोग्याला हानिकारक ठरु शकते. त्यासाठी मिठाईचा रंग जास्त गडद दिसला तर ती खरेदी करु नका. कोणताही गोडाचा पदार्थ हा अधिक चमकणारा असला की, तो अधिक भेसळयुक्त असतो. 

मिठाई बनवल्यानंतर ती अधिक छान दिसावी यासाठी चांदीचा वर्ख वापरला जातो. परंतु कधी कधी दुकानदार यावर ॲल्युमिनियमच्या कागदाचा वापर करतात. जे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. मिठाईवर चांदीचे वर्ख असायला हवे. हे जाणून घेण्यासाठी तो वर्ख आपण बोटांवर घासल्यास तो सहज आपल्या हाताला चिपकेल आणि विरघळेल.  

समर स्पेशल: कैरी आणि बोराची आंबटगोड चटणी! करायला अगदी सोपी, उन्हाळ्यात जेवणाच हवीच हवी

शिळ्या मिठाईला विचित्र वास येतो. ज्याची चव आंबट लागते. अनेकदा ती चिकट ही होते. त्यासाठी खूप चमकदार किंवा रंगीत मिठाई खरेदी करणं टाळा ती भेसळयुक्त असू शकते. जर मिठाई ताजी आहे की, शिळी तपासायची असेल तर पाण्यात विरघळवा. जर पाण्याला रंग आला तर त्यात रासायनिक रंगांचा वापर केला आहे. तसेच मिठाई गॅसवर जाळून पाहा. बनावट मिठाई ही लगेच जळते. 


 

Web Title: how to find out fake adulterated sweets and synthetic mawa holi festive season simple hacks tips and tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.