Join us

टॉयलेटचे पिवळे डाग निघतच नाहीत? १ चमचा हा पांढरा पदार्थ घाला, पांढराशुभ्र दिसेल टॉयलेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:53 IST

How To Clean Yellow Toilet Seat : कमीत कमी वेळात टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काही सोपे, खास उपाय करू शकता.

प्रत्येक घरामध्ये टॉयलेटचा वापर वारंवार केला जातो. ज्यामुळे टॉयलेट घाणेरडं होतं. टॉयलेट घाण असेल तर  टॉयलेट सीटवर बरेच किटाणू पसरतात हे तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकते. टॉयलेटचा नियमित वापर करणं गरजेचं असतं. यामुळे मेहनत अधिक करावी लागते. याव्यतिरिक्त टॉयलेट साफ करण्यासाठी  महागड्या क्लिनरचा वापर केला जातो पण तरीही हवा तसा परीणाम दिसून येत नाही.  (How To Clean Yellow Toilet Seat Bathroom Cleaning Hacks)

कमीत कमी वेळात टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काही सोपे, खास उपाय करू शकता. काही घरगुती उपाय केल्यास तुमचं टॉयलेट नव्यासारखं चमकू लागेल आणि जास्त मेहनतही करावी लागणार नाही. टॉयलेट साफ करण्यासाठी तुम्ही १ पांढरा पदार्थ वापरू शकता. ज्यामुळे टॉयलेट चमकेल आणि पिवळे डागही निघून जातील. (How To Clean Yellow Toilet Seat)

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी बेकींग सोडा आणि व्हिनेगर हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर एक शक्तीशाली क्लिनिंग एजंट आहे. ज्यामुळे टॉयलेटवर लागलेले डाग हटवण्यास मदत होते. याचा वापर करण्यासाठी १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा व्हिनेगर मिसळून टॉयलेट सीटवर लावा. १० ते १५ मिनिटं तसंच ठेवा. नंतर गरम पाण्यानं धुवून घ्या. हा उपाय केल्यानं टॉयलेट नव्यासारखं चमकू लागेल.

ब्लाऊजच्या स्लिव्हजचे १० नवीन पॅटर्न्स; पफ, बलून स्लिव्हजच्या फॅन्सी डिजाईन्स, उठून दिसाल

लिंबाचा रस आणि बेकींग सोडा

टॉयलेट साफ करण्यासाठी लिंबाचा रस आणि बेकींग सोडा एक असरदार उपाय आहे. हे एक नैसर्गिक क्लिनिंग एजंट आहे. ज्यामुळे टॉयलेटवरचे पिवळे डाग हटवण्यास मदत होते. १ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा  बेकिंग सोडा मिसळून टॉयलेट सीटवर लावा. १० ते १५ मिनिटं तसंच ठेवा नंतर पाण्यानं धुवा.

डिश वॉश लिक्विड आणि गरम पाणी

डिश वॉश लिक्विड आणि गरम पाणी वापरून तुम्ही टॉयलेट स्वच्छ करू शकता. १ चमचा डिश वॉश लिक्विड  गरम पाण्यात मिसळून टॉयलेट सीटवर लावा आणि काही मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्यानं धुवा. हा उपाय केल्यास तुम्हाला टॉयलेट सीटवरचे पिवळे डाग निघालेले दिसतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Remove yellow toilet stains easily with this one white ingredient.

Web Summary : Tired of yellow toilet stains? Baking soda, vinegar, or lemon juice offer effective, natural cleaning. Combine with hot water, apply, let sit, and rinse for a sparkling clean toilet.
टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्सहोम रेमेडी