Join us

पाण्याच्या टाकीत १ चमचा ही पांढरी पावडर घाला; टाकीत न उतरता-न घासताही होईल स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:45 IST

How To Clean Water Tank : सगळ्यात आधी टाकीतलं सर्व पाणी काढून टाका. जास्त पाणी वाया घालवू नका. जेव्हा टाकी खाली झाली असेल तेव्हाच टाकी धुवा.

पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचं काम खूपच किचकट वाटतं. पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागणार नाही. टाकी साफ करण्यासाठी तुम्हाला फक्त १० रूपयांची पावडर लागेल. महागड्या क्लिनरचा वापर न करता तुम्ही सोप्या पद्धतीनं टाकी साफ करू सकता. टाकी साफ करण्यासाठी तुम्हाला मजबूत शिडीची आवश्यकता असेल.  (Water Tank Cleaning Tips How To Clean Water Tank Easiest Way)

टाकी धुताना मदतीसाठी घरातील एखादा सदस्य सोबत ठेवा. घरात पाण्याचा मुख्य सप्लाय आणि मोटार बंद करा जेणेकरून टाकी धुताना टाकीत पाणी भरणार नाही. सगळ्यात आधी टाकीतलं सर्व पाणी काढून टाका. जास्त पाणी वाया घालवू नका. जेव्हा टाकी खाली झाली असेल तेव्हाच टाकी धुवा. (How To Clean Water Tank)

१० रूपयांची पांढरी पावडर कोणती

आपण ज्या पांढऱ्या पावडरबद्दल बोलत आहोत ती म्हणजे मीठ. जे एका नैसर्गिक क्लिनरप्रमाणे काम करते. मिठात नैसर्गिक गुणधर्म असतात. ज्यामुळे घाण कमी होण्यास मदत होते. १ बादली पाण्यात मीठ घालून द्रावण तयार करा. नंतर हे द्रावण टाकीच्या भिंती आणि फरशीवर व्यवस्थित घाला. या डागांवर तुम्ही थोडं सुकं मीठही घालू शकता. द्रावण घातल्यानंतर थोड्यावेळासाठी असंच ठेवून द्या. यादरम्यान मिठाला आपलं काम करण्यासाठी थोडा वेळ मिळेल आणि डाग कमी होतील.

शेवटच्या पायरीत टाकी ब्रशनं घासल्यानंतर पाण्याचा पंप काहीवेळ सुरू ठेवा. नंतर टाकी व्यवस्थित धुवून घ्या. टाकी कमीत कमी २ वेळा साफ करा जेणेकरून यात कोणतीही घाण राहणार नाही. मिठाच्या वापरानं तुम्ही अनेक कामं सोपी करू शकता. टाकी साफ करण्यासाठी तुम्ही वॅक्यूम क्लिनरचा वापर करू शकता. टाकीतलं पाणी ओतून ती कोरडी करून त्यात वॅक्यूम क्लिनर फिरवा. ज्यामुळे घाण निघून जाण्यास मदत होईल.

टाकीतल्या पाण्यात तुम्ही तुरटीसुद्धा फिरवू शकता. तुरटी फिरवल्यामुळे जंतू कमी होतील आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनच धोका कमी होईल. टाकी धुतल्यानंतर ती स्वच्छ कापडानं पुसून घ्या. टाकीच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. ज्यामुळे डास तयार होऊ शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Clean water tank easily: Just add this one white powder.

Web Summary : Cleaning water tanks is simplified using salt, a natural cleaner. Mix salt with water, apply to the tank's surfaces, let it sit, scrub, and rinse thoroughly. For extra cleaning, use a vacuum or alum. Keep the area dry.
टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया