Tap Cleaning Tips : अनेकदा आपण बघतो की, किचनमधील नळ असो वा बाथरूमधील त्यावर पाण्याचे पांढरे डाग पडतात. जे दिसायला फार वाईट असतात आणि सोबतच यामुळे नळ खराब देखील होतात. पाण्यातीलवल क्षारच्या जास्त प्रमाणामुळे नळांवर तोट्यांवर हे डाग पडतात. जे सहजपणे निघतही नाही. किंवा एकदा निघाले तरी लगेच पुन्हा पडतात. लोक कामापुरती त्यांची स्वच्छता करतात. पण त्यांची हवी तशी स्वच्छता होत नाही. अशात आज आम्ही तुम्हाला नळांच्या तोट्यांवरील डाग, चिकटपणा दूर करणारे उपाय सांगणार आहोत.
नळांवरील डाग कसे दूर कराल?
लिंबाचा रस
अनेक वस्तूंवरील चिव्वट डाग काढण्यासाठी, वस्तू चकाचक चमकवण्यासाठी लिंबाचा रस खूप फायदेशीर ठरतो. लिंबाचा रस एक नॅचरल क्लीनिंग एजंट आहे. जर किचन किंवा बाथरूममधील नळ काळे पडले असतील तर ते तुम्ही लिंबाच्या मदतीने स्वच्छ करता. यासाठी लिंबाचा रस नळावर टाका आणि सालीने घासा. याने डाग दूर होतील.
टूथपेस्ट
नळांवरील पाण्याचे पांढरे किंवा काळे डाग दूर करण्यासाठी आपण टूथपेस्टची सुद्धा मदत घेऊ शकता. यासाठी थोडी टूथपेस्ट नळांवरील डागांवर लावा आणि नंतर एखाद्या सॉफ्ट टूथब्रशने किंवा कापडाने नळ घासावेत. डाग पूर्णपणे गेलेले दिसतील, सोबतच नळ पुन्हा नव्यासारखे चमकू लागतील.
डिटर्जेंट
नळांवरील पाण्याचे डाग फारच सामान्य असतात. जे तुम्ही डिटर्जेंटच्या मदतीने दूर करू शकता. नळ पुन्हा चमकदार करण्यासाठी थोड्या पाण्यात डिटर्जेंट पावडर मिक्स करा. आता या पाण्यात स्पंज भिजवा आणि त्याने नळ स्वच्छ करा.
व्हाईट व्हिनेगर
व्हाईट व्हिनेगरमध्ये माइल्ड अॅसिड असतं. याने वेगवेगळ्या प्रकारचे डाग दूर करण्यास मदत मिळते. याचा वापर तुम्ही नळांवरील चिव्वट डाग दूर करण्यासाठी करू शकता. यासाठी तुम्हाला एका वाट्यात व्हाईट व्हिनेगर आणि गरम पाणी समान प्रमाणात घ्यावं लागेल. नंतर ब्रश किंवा स्पंजच्या मदतीने हे मिश्रण नळावर लावा. साधारण अर्धा तास ते तसंच ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने स्वच्छ करा.
बेकिंग सोडा
नळांवर लागलेले डाग दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याची पेस्टही फायदेशीर ठरते. ही तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये १ ते २ चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात अर्धा ग्लास पाणी टाकून चांगलं मिक्स करा. आता ब्रशच्या मदतीने हे नळांवर काही मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर साध्या पाण्याने नळ धुवून घ्या.
