Join us
Daily Top 2Weekly Top 5

५ मिनिटांत नव्यासारखा चमकेल इमर्शन रॉड; हिटर स्वच्छ करण्याची खास ट्रिक, पाण्याचे डाग ही निघतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 20:26 IST

How To Clean Water Immersion Rod : रोज रोज वापरल्यामुळे या रॉडवर पाण्याचे डाग येतात. काही घरगुती उपाय करून तुम्ही इमर्शन रॉड नव्यासारखा चमकवू शकता.

हिवाळ्याच्या (Winter) दिवसांत बरेचजण अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी  हिटर इमर्शन रॉडचा वापर करतात. पाणी गरम करण्यासाठी बाथरूममध्ये गिजर  तर काहीजण इमर्शन रॉडचा वापर करतात. इमर्शन रॉडचा जास्तीत जास्त वापर केला जातो. हे रॉड फक्त स्वस्त नसून याच्या वापरानं वीजबीलसु्द्धा जास्त येत नाही (Home Hacks). पण रोज रोज वापरल्यामुळे या रॉडवर पाण्याचे डाग येतात. पण काही घरगुती उपाय करून तुम्ही इमर्शन रॉड नव्यासारखा चमकवू शकता. इमर्शन रॉड साफ करण्याचे सोपे उपाय पाहूया. (How To Clean Water Immersion Rod How To Clean Water Heating)

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

बेकिंग सोडा क्लिनिंग एजंटचे काम करतो. एका बादलीत पाणी घ्या. त्यात एक कप व्हिनेगर आणि दोन ते तीन चमचे बेकिंग सोडा (खाण्याचा सोडा) घाला. यामुळे फेस येईल, रॉडला या द्रावणात सुमारे १० ते २० मिनिटे बुडवा. बाहेर काढून ब्रशच्या मदतीने स्क्रब करा आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हे बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचं मिश्रण हट्टी डाग लगेच काढून टाकण्यास प्रभावी  ठरतं. 

व्हाईट व्हिनेगर

एका मोठ्या भांड्यात किंवा बादलीत पाणी आणि व्हाईट व्हिनेगर सम प्रमाणात मिसळा. इमर्शन रॉडचा खराब झालेला भाग या द्रावणात ३० मिनिटांपासून ते एका तासासाठी बुडवून ठेवा. काही वेळानंतर रॉड बाहेर काढून ब्रशने किंवा स्क्रबरने हळूवारपणे रगडा. रॉड स्वच्छ पाण्याने धुवून पूर्णपणे सुकवा. जेणेकरून गंज लागणार नाही. खूप जाड थर असल्यास व्हिनेगरचा वापर फक्त १५-२० मिनिटे करा आणि नंतर घासून घ्या.

लिंबू आणि मीठ

एका वाटीत दोन ते तीन लिंबाचा रस घ्या. त्यात एक चमचा साधे मीठ किंवा जाडे मीठ मीठ घालून घट्टसर पेस्ट तयार करा.ही पेस्ट रॉडवर साचलेल्या पांढऱ्या थरावर किंवा गंजाच्या डागांवर लावा आणि २० ते ३० मिनिटे तशीच राहू द्या.नंतर जुना टूथब्रश किंवा मऊ स्क्रबर वापरून रॉड हलक्या हाताने घासून घ्या. रॉड स्वच्छ पाण्याने धुवून कोरडा करा. या उपायांनी वॉटर हिटरवरचे डाग सहज निघून जाण्यास मदत होईल. लिंबू आणि मिठाचे मिश्रण डाग काढून टाकण्यास मदत करेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Clean Immersion Rod in 5 Minutes: Easy Heater Cleaning Tricks

Web Summary : Easily clean your immersion rod with baking soda, vinegar, or lemon and salt. These simple home remedies remove water stains and keep your heater sparkling like new, extending its life and efficiency.
टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया