Join us

टीव्ही- लॅपटॉपचा स्क्रिन स्वच्छ करण्याचा सोपा उपाय! स्क्रॅचेस न येता डाग होतील गायब चटकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2025 17:44 IST

How To Clean TV And Laptop Screens?: टीव्ही किंवा लॅपटॉप स्क्रिन स्वच्छ करण्याचा हा एक सोपा उपाय पाहून घ्या..(home hacks to clean TV and laptop screens)

ठळक मुद्देयासाठी तुम्हाला कान स्वच्छ करण्याचे इअर बड, मायक्रोफायबरचा एक कपडा आणि स्वच्छ पाणी लागणार आहे.

हल्ली जवळपास प्रत्येक घर असं आहे जिथे लॅपटॉप आणि टीव्ही हमखास आहेच.. शिवाय आता अशी परिस्थिती आहे की लॅपटॉप आणि टीव्हीची संख्या प्रत्येक घरात एक एवढीच मर्यादित राहिलेली नाही. प्रत्येक खोलीमध्ये टीव्ही तसेच प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीसाठी तसेच कॉलेजमधे शिकणारे मुलं असतील तर त्यांच्यासाठी स्वतंत्र लॅपटॉप घरोघरी आहेत. आपल्या घरातली इतर उपकरणं आपण ज्याप्रमाणे स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे टीव्ही, लॅपटॉप, कम्प्युटरची स्क्रिनसुद्धा स्वच्छ करणं गरजेचं असतं (home hacks to clean TVz and laptop screens). ते नेमकं कसं करावं ते पाहूया..(How to clean TV and laptop screens?)

 

लॅपटॉप, टीव्हीची स्क्रिन कशी स्वच्छ करावी?

लॅपटॉप, टीव्ही, कम्प्युटर या उपकरणांच्या स्क्रिन अतिशय नाजूक असतात. त्यामुळे आपण इतर वस्तू ज्याप्रमाणे बिंधास्त स्वच्छ करतो, पाणी लावून पुसतो त्या पद्धतीने या स्क्रिन स्वच्छ करून अजिबात चालत नाही.

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर घ्या १ ग्रॅमची सुंदर नथ, ८ मोहक डिझाईन्स- करा नथीचा नखरा..

त्यामुळेच आता लॅपटॉप, टीव्ही आणि कम्प्युटर यांच्या स्क्रिन कशा पद्धतीने स्वच्छ करायच्या ते पाहूया.. यासाठी सगळ्यात आधी तर तुम्हाला कान स्वच्छ करण्याचे इअर बड, मायक्रोफायबरचा एक कपडा आणि स्वच्छ पाणी लागणार आहे. या स्क्रिन स्वच्छ करण्यासाठी बोअरवेलच्या क्षारयुक्त पाण्याचा म्हणजेच हार्ड वाॅटरचा वापर करणे टाळावे.

 

आता सगळ्यात आधी तर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्या. त्यामध्ये इअरबडचं टोक बुडवा. त्यानंतर बोटाच्या चिमटीमध्ये दाबून इअरबडमधलं अतिरिक्त पाणी काढून टाका. आता या इअर बडच्या मदतीने लॅपटॉप, कम्प्युटर किंवा टीव्हीच्या चारही बाजू आणि चारही कॉर्नर स्वच्छ करा. त्या बाजूंवरून अलगदपणे इअरबड फिरवा.

गुढीपाडव्याला पैठणी घ्यायची म्हणता? बघा सध्या ट्रेण्डिंग असणारे पैठणीमधले ५ रंग- दिसाल आकर्षक

आता स्क्रिनची स्वच्छता करण्यासाठी कपड्याचा एक छोटासा भाग पाण्यात बुडवा. तो दाबून त्यातलं अतिरिक्त पाणी काढून टाका आणि हा ओलसर कपडा गोलाकार पद्धतीने स्क्रिनवर फिरवून स्क्रिन स्वच्छ करा. स्क्रिन स्वच्छ करताना त्यावर अजिबात जोर देऊ नका. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सलॅपटॉपटेलिव्हिजन