Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > हातानं किंवा ब्रशनं न घासता चमकेल टॉयलेट; १ घरगुती मॅजिक लिक्विड-झटपट करेल सफाई

हातानं किंवा ब्रशनं न घासता चमकेल टॉयलेट; १ घरगुती मॅजिक लिक्विड-झटपट करेल सफाई

How To Clean Toilet Without Using Hands : किचनमध्ये असलेले बेकिंग सोडा, कपूर यांसारख्या पदार्थांचा वापर करून तुम्ही काळपटपणा दूर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:40 IST2026-01-02T14:16:31+5:302026-01-02T14:40:47+5:30

How To Clean Toilet Without Using Hands : किचनमध्ये असलेले बेकिंग सोडा, कपूर यांसारख्या पदार्थांचा वापर करून तुम्ही काळपटपणा दूर करू शकता.

How To Clean Toilet Without Using Hands : How To Clean Toilet Easily Cleaning Hacks | हातानं किंवा ब्रशनं न घासता चमकेल टॉयलेट; १ घरगुती मॅजिक लिक्विड-झटपट करेल सफाई

हातानं किंवा ब्रशनं न घासता चमकेल टॉयलेट; १ घरगुती मॅजिक लिक्विड-झटपट करेल सफाई

कोणत्याही घरांत टॉयलेट, बाथरूमचा वापर वारंवार होत असला तरी टॉयलेट साफ करायचं म्हटलं तर अनेकांना टेंशन येतं. हात न लावता, ब्रशने जास्तवेळ न रगडता टॉयलेट स्वच्छ करणं खूपच सोपं आहे त्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही. ज्यामुळे साफ-सफाईचा ताण कायमचा कमी होईल. (How To Clean Toilet Without Using Hands)

किचनमध्ये असलेले बेकिंग सोडा, कपूर यांसारख्या पदार्थांचा वापर करून तुम्ही काळपटपणा दूर करू शकता जेणेकरून टॉयलेट  २४ तास सुगंधित राहील. एक बॉटल फ्लश टँकमध्ये टाकून ठेवल्यास टॉयलेट नव्यासारखं चमकण्यास मदत होईल. (How To Clean Toilet Easily)

हा उपाय कसा करावा?
 

हा उपाय करण्यासाठी किचनमध्ये असलेलं साहित्य  वापरू शकता. सगळ्यात आधी एका वाटीत १ ग्लास पाणी घ्या. त्यात २ चमचे मीठ आणि १ चमचा बेकिंग सोडा मिसळा. मीठ किटाणूंना मारण्यास मदत करते तर बेकिंग सोडा पिवळेपणा आणि डाग काढून टाकण्याचे काम करतो. हे मिश्रण लावल्यास टॉयलेट न रगडता स्वच्छ करता येते. युट्युबर पूनम सिंहनं एक स्मार्ट  हॅक सांगितला आहे.

दुर्गंध पळवण्याचं सिक्रेट

टॉयलेट फक्त स्वच्छ झालं म्हणजे काम होत नाही. दुर्गंधही घालवावा लागतो. यासाठी  कापराच्या गोळीची पावडर तयार करून ठेवा. कापूर आपल्या  तीव्र सुगंधासाठी ओळखला जातो. त्यानंतर एका लिंबाचा रस त्यात पिळून घाला. लिंबू फक्त घाण साफ करत नाही तर टॉयलेटला एक नैसर्गिक  फ्रेशनेससुद्धा देतो. कापूर आणि लिंबाचे मिश्रण टॉयलेट २४ तास सुगंधित ठेवते.

मॅजिक लिक्विड

घरगुती पदार्थ मिसळ्यानंतर एका जुन्या प्लास्टीकच्या बॉटलमध्ये भरून घ्या. नंतर हे मिश्रण प्रभावी बनवण्यासाठी यात थोडं टॉयलेट क्लिनर घाला. घरगुती पदार्थांचे पॉवरफुल कॉम्बिनेशन सामान्य क्लिनरच्या तुलनेत अधिक शक्तीशाली  ठरते. 

हे मिश्रण तयार झाल्यानंतर बॉटलचं झाकण व्यवस्थित बंद  करा. नंतर एक सुई किंवा खिळा गरम करून बॉटलच्या झाकणावर २ ते ३ छिद्र तयार करा. ही टेक्निक तुमचं काम सोपं करेल. नंतर बॉटल उलटी करून टॉयलेट फ्लश टँकच्या आत एका कोपऱ्यात ठेवा.  उलटं ठेवल्यानं मिश्रण हळू हळू टँकच्या पाण्यात मिसळत राहील आणि टॉयलेट क्लिन राहील.

Web Title : टॉयलेट की सफाई आसान: बिना रगड़े घरेलू जादुई तरल से सफाई

Web Summary : घरेलू घोल का उपयोग करके बिना रगड़े आसानी से अपने टॉयलेट को साफ करें। बेकिंग सोडा, नमक, नींबू और कपूर मिलाएं। एक बोतल में मिश्रण को छेद करके फ्लश टैंक में रखें, जिससे टॉयलेट साफ और ताजा रहेगा।

Web Title : Clean Toilet Easily: Homemade Magic Liquid Cleans Without Scrubbing

Web Summary : Easily clean your toilet without scrubbing using a homemade solution. Combine baking soda, salt, lemon, and camphor. Place the mixture in a bottle with holes in the flush tank for a fresh, clean toilet.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.