घरातील सगळ्यात जास्त वापरला जाणारा आणि अस्वच्छ भाग म्हणजे टॉयलेट बाथरूम. टॉयलेट साफ करणं अनेकांना नकोसं वाटतं. नेहमी ब्रशन घासून स्वच्छ करण्यात बराचवेळ जातो. खासकरून दिवाळीसारखे सण येतात तेव्हा घराची स्वच्छता करावीच लागते. किचकट वाटणारं हे काम सोपं करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता (How To Clean Toilet Without Brushing).
अशावेळी टॉयलेट साफ करण्यासाठी जास्त वेळ न लावता तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. युट्यूबर स्वाती आर्या यांनी एक बॉटलचा एक सोपा उपाय सांगितला आहे. या उपाय करून तुम्ही टॉयलेट सहज स्वच्छ करू शकता. या उपायानं टॉयलेटमध्ये दुर्गंध येणं टाळता येऊ शकतं.
सगळ्यात आधी 1 प्लास्टीकची लहान बाटली घ्या. या बाटलीचं झाकण उघडून त्यात गरम खिळा किंवा सेफ्टी पिनच्या साहाय्यानं 2 ते 3 छिद्र पाडून घ्या. छिद्र जास्त मोठे करू नका अन्यथा द्रावण लवकर संपू शकतं आणि तुम्हाला सतत प्रोसेस करावी लागेल. बॉटलमध्ये सगळ्यात आधी थोडं टॉयलेट क्लिनर घाला. त्यानंतर 1 चमचा बेकिंग सोडा घाला. नंतर बॉटलमध्ये पाणी घाला जेणेकरून सर्व पदार्थ आपोआप एकत्र होतील. बेकिंग सोडा आणि क्लिनिंग एजंटचं हे एक उत्तम द्रावण आहे. यात तुम्ही व्हिनेगरचं मिश्रणही घालू शकता.
न लाटता, न कणीक मळता चपात्या करण्याची खास ट्रिक; १० मिनिटांत होतील ५० मऊसूत चपात्या
द्रावण तयार झाल्यानंतर बाटलीचं झाकण लावून फ्लश टँकमध्ये योग्य पद्धतीनं ठेवा. तुम्ही ही बॉटल उलट्या साईडनंसुद्धा ठेवू शकता. जेव्हा तुम्ही फ्लश बटन दाबाल तेव्हा टँकचं पाणी बरोबर बाऊलमध्ये जाईल. बॉटलमधून निघणारे द्रावण आपआप टॉयलेट स्वच्छ करेल. जर तुम्हाला लिक्विड क्लिनरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही अजून एक सोपा पर्याय वापरू शकता.
साडीत बारीक कसं दिसायचं? ८ टिप्स; कर्व्ही फिगर दिसेल, पोट जराही दिसणार नाही-स्लिम दिसाल
हा पर्याय स्वस्तसुद्धा आहे. कपडे धुताना छोटे छोटे साबणाचे तुकडे उरलेले असतात. हे तुकडे अनेकदा वाया जातात. हे तुकडे एकत्र करून एका स्वच्छ सॉक्समध्ये घालून फ्लश टँकमध्ये घालू शकता. याव्यतिरिक्त फिनाईलची गोळीसुद्धा फ्लश टँकमध्ये तुम्हाला घालता येईल ज्यामुळे टॉयलेट स्वच्छ होईल.
Web Summary : Clean the toilet easily with a bottle trick. Add cleaner, baking soda, and water to a bottle with holes, place in the flush tank. Soap scraps in a sock or phenyl tablets also work.
Web Summary : बोतल की ट्रिक से आसानी से टॉयलेट साफ करें। छेद वाली बोतल में क्लीनर, बेकिंग सोडा और पानी डालकर फ्लश टैंक में रखें। मोज़े में साबुन के टुकड़े या फिनाइल की गोलियां भी काम करती हैं।