lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > ब्रशने न घासताही टॉयेलट स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक; पटापट नव्यासारखं क्लिन होईल टॉयलेट

ब्रशने न घासताही टॉयेलट स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक; पटापट नव्यासारखं क्लिन होईल टॉयलेट

How To Clean Toilet Bathroom Easily : टॉयलेट पॉट साफ करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 09:32 PM2024-04-16T21:32:21+5:302024-04-16T21:33:46+5:30

How To Clean Toilet Bathroom Easily : टॉयलेट पॉट साफ करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.

How To Clean Toilet Bathroom Easily : How To Clean Toilet Without Using Hands | ब्रशने न घासताही टॉयेलट स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक; पटापट नव्यासारखं क्लिन होईल टॉयलेट

ब्रशने न घासताही टॉयेलट स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक; पटापट नव्यासारखं क्लिन होईल टॉयलेट

बाथरूम टॉयलेटची साफसफाई करणं जितकं सोपं वाटतं तितकं ते सोपं कधीच नसते. (How to clean bathroom quickly) काहीजण वरवर फक्त टॉयलेटची साफ-सफाई करतात तर काहीजण पूर्णपणे  टॉयलेट बाथरूम क्लिन ठेवतात. बाथरूम आणि टॉयलेट पिवळं पडायला फार वेळ लागत  नाही. (How To Clean Toilet Without Using Hands) टॉयलेट पॉट साफ करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (How to Clean Toilet Quickly)

टुथपेस्टचा वापर करा

टूथपेस्ट तुमच्या दातांचा पिवळसरपणा तर दूर करेलच पण तुमचे टॉयलेट पॉटही उजळेल. यासाठी सर्वप्रथम टूथपेस्ट घाण झालेल्या भांड्यात घ्या. त्यात ३ ते ४ चमचे लिंबाचा रस घाला.आता 1 टीस्पून मीठ घालून मिक्स करा. या मिश्रणात ब्रश बुडवून या मिश्रणाने टॉयलेट स्वच्छ करा.  नंतर पेटींग ब्रशच्या मदतीने टॉयलेट पॉटवर टुथपेस्ट लावा.  ही पेस्ट टॉयलेट सीट सुकल्यावर त्यावर गरम पाणी घाला. या प्रक्रियेनंतर तुम्हाला टॉयलेटचा पिवळेपपणा पूर्ण दूर झालेला दिसेल. या उपायाने तुम्ही बाथरूमच्या टाईल्सही स्वच्छ करू शकता. 

इनो

इनोच्या मदतीने टॉयलेट पॉय स्वच्छ करणं खूपच सोपं आहे. यासाठी जास्त खर्चही येणार नाही. सगळ्यात आधी एका  भांड्यात  ३ चमचे पाणी घ्या. त्यात इनो मिसळून लिक्विड तयार करा. घरात लिक्वीड नसेल तर तर तुम्ही डिटर्जंट पावडरचा वापर करू शकता.  या वस्तू मिसळल्यानंतर मिश्रण जाड, घट्ट व्हायला हवं.  त्यानतंत ही पेस्ट टॉयलेट पॉटच्या अशा भागांवर लावा जिथे पिवळेपणा खूप आहे. 

ही पेस्ट बाथरूमध्ये लावा आणि व्यवस्थित कोरडे होऊ द्या. जेव्हा टॉयलेट पॉट सुकेल तेव्हा हळूहळू त्याभोवती गरम पाणी घाला. पाणी टाकताना चेहऱ्यावर मास्क लावा. जेणेकरून जिवाणू शरीरात प्रवेश करणार नाहीत. या पद्धतीने टॉयलेट पॉटचा पिवळेपणा साफ करणं खूपच सोपं आहे.

व्हिनेगर आणि बेकींग सोडा

यासाठी तुम्हाला प्रथम टॉयलेट पॉटच्या किनारी व्हिनेगर टाकावे लागेल. यानंतर त्यात बेकिंग सोडा टाका आणि अर्धा तास तसाच राहू द्या. अर्ध्या तासानंतर, टॉयलेट पॉटच्या बाजूने हळूहळू गरम पाणी घाला आणि ब्रशच्या मदतीने घासून घ्या. असे केल्याने टॉयलेट सीटच्या काठावरील पिवळसरपणा निघून जाईल.

Web Title: How To Clean Toilet Bathroom Easily : How To Clean Toilet Without Using Hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.