स्वयंपाक घरातील पोळपाट - लाटणं हमखास रोजच्या चपात्या करण्यासाठी वापरलं जात. दररोज किमान सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळच्या स्वयंपाकासाठी पोळपाट - लाटणं वापरतो. प्रत्येकवेळी चपात्या करताना यावर कणीक चिकटते, कोरडं पीठ लागत वारंवार असं होऊन एका विशिष्ट कालांतराने हे नेहमीच्या(What is the best way to clean a rolling pin) वापरातील पोळपाट - लाटणं खराब होतं. यासाठीच, त्याची वेळीच योग्य ती स्वच्छता करणे गरजेचे असते. जर पोळपाट - लाटणं वेळीच लक्ष देऊन स्वच्छ केलं नाही तर तर त्यावर डाग, चिकटपणा आणि बॅक्टेरिया साचू शकतात. त्यामुळे पोळपाट-लाटणं खराब होण्याची शक्यता वाढते, जी आपल्या आरोग्यासाठीही घातक ठरू शकते(HOW TO CLEAN POLPAT LATNA).
चपात्या तयार करण्यासाठी दररोज (Tip To Keep Your Chakla Belan Last Longer) पोळपाट- लाटण्याचा वापर केला जातो (What is the best way to clean a wooden rolling pin) म्हटल्यावर त्याची स्वच्छता देखील तितकीच महत्वाची आहे. रोज वापरुन पोळपाट लाटण खराब होतच यासाठी त्याची वेळोवेळी स्वच्छता करणे तितकेच गरजेचे असते. यासाठी काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवून आपण अगदी सोप्या पद्धतीने पोळपाट - लाटणं स्वच्छ करु शकतो. यासाठी नेमकं काय करायच ते पाहूयात.
पोळपाट - लाटणं स्वच्छ करण्यासाठी सोप्या टिप्स...
१. लिंबाचा वापर करा :- पोळपाट - लाटणं स्वच्छ करण्यासाठी आपण लिंबाचा वापर करू शकता. लिंबाच्या मदतीने पोळपाट - लाटणं स्वच्छ करणं खूप सोपं होतं, कारण लिंबू नैसर्गिक क्लीनर म्हणून काम करतं. लिंबाचा रस थेट पोळपाट - लाटण्यावर घालून स्क्रबरच्या मदतीने ते नीट घासून स्वच्छ करू शकता.
कपभर मुरमुऱ्यांचा करा इन्स्टंट मेदू वडा! चविष्ट आणि पौष्टिक ब्रेकफास्ट फक्त १५ मिनिटांत...
२. गरम पाणी :- गरम पाणी हा पोळपाट - लाटणं स्वच्छ करण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. एका मोठ्या भांडयात गरम पाणी ओतून त्यात आपण हे पोळपाट - लाटणं अर्धा तास भिजत ठेवून देऊ शकता. यामुळे त्याला चिकटलेली कणीक देखील अगदी सहज निघण्यास मदत होईल. अर्ध्या तासानंतर आपण नेहमीप्रमाणे पोळपाट - लाटणं स्वच्छ धुवून घेऊ शकता.
३. टूथब्रश :- आपण टूथब्रशच्या मदतीने देखील अगदी मिनिटभरात पोळपाट - लाटणं स्वच्छ करु शकता. ब्रश थोडासा पाण्यात भिजवून ओला करा, आता ओल्या ब्रशने पोळपाट - लाटणं घासून घ्या. यामुळे पोळपाट - लाटण्याला चिकटलेली सुकलेली कणीक देखील अगदी सहज निघते.
कढी फुटते-पांचट लागते-बेसनाच्याही गुठळ्या होतात? टाळा ४ चुका, कढी होईल फक्कड...
४. लिंबाची फोड आणि मीठ :- पोळपालट - लाटणं स्वच्छ करण्यासाठी आपण लिंबाची अर्धी फोड आणि चमचाभर मिठाचा देखील वापर करु शकतो. अर्ध्या कापलेल्या लिंबाच्या फोडीवर थोडे मीठ घालावे. आता अशी लिंबाची फोड पोळपालट - लाटण्यावर घासून घ्यावी. त्यानंतर १५ ते २० मिनिटे पोळपालट - लाटणं तसेच ठेवून द्यावे. मग नेहमीप्रमाणे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.