Join us

तेल गळून प्लास्टीकचे डबे चिकट-तेलकट झाले? ५ सोपे उपाय- डबे चकचकीत, लागा दिवाळीच्या साफसफाईला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 17:50 IST

How To Clean Oil Stained Kitchen Containers : डब्यामध्ये थोडं भांडी घासण्याचं द्रावण घ्या. त्यात गरम पाणी घाला आणि कागदी नॅपकिनचे छोटे तुकडे घाला.

स्वयंपाकघरात किंवा टिफिन ऑफिसला नेण्यासाठी प्लास्टीकचे डबे सर्वाधिक वापरले जातात. रोज रोज तेल लागून प्लास्टीकचे भाजीचे डबे तेलकट किंवा चिकट होतात. या डब्यांचा चिकटपणा आणि वास  सहजासहजी जात नाही. साधे साबण आणि पाण्याने घासूनही ते नीट स्वच्छ होत नाहीत, ज्यामुळे ते वापरणे त्रासदायक ठरते. भाजीचे डबे कमी तेलकट होण्यासाठी आणि चिकटपणा निघून जाण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. प्लास्टीकचे भाजीचे डबे कमी तेलकट होण्यासाठी सोपे उपाय कोणते ते पाहूया. (How To Clean Oil Stained Kitchen Containers Boxes Utensils In Easy Way) 

बेकिंग सोडा आणि पाणी

डब्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि थोडे पाणी मिसळून त्याची जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट तेलकट भागांवर लावा आणि १०-१५ मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर डबा जुन्या टूथब्रशने किंवा स्पंजने (Sponge) घासून घ्या. गरम पाण्याने डबा स्वच्छ धुवा. बेकिंग सोडा तेलाचे कण शोषून घेतो आणि वासही दूर करतो.

लिंबाचा रस आणि मीठ

अर्ध्या लिंबाचा रस डब्यात पिळा आणि त्यात एक चमचा मीठ घाला. लिंबाच्या सालीने किंवा स्पंजच्या मदतीने हे मिश्रण तेलकट भागावर चांगले चोळा. ५ मिनिटे ठेवल्यानंतर गरम पाण्याने डबा स्वच्छ धुवा.

व्हिनेगर

एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यात अर्धा कप व्हिनेगर मिसळा. तेलकट डबा या व्हिनेगरच्या पाण्यात ३० मिनिटे बुडवून ठेवा.अर्ध्या तासानंतर डबा बाहेर काढून साध्या साबणाने आणि पाण्याने धुवा.

भांडी घासण्याचं लिक्वीड

डब्यामध्ये थोडं भांडी घासण्याचं द्रावण घ्या. त्यात गरम पाणी घाला आणि कागदी नॅपकिनचे छोटे तुकडे घाला. डब्याचे झाकण नीट लावा आणि ते चांगले जोरजोरात हलवा. कागदी नॅपकिन तेलाचे कण शोषून घेतात आणि साबणाच्या मदतीने ते लवकर स्वच्छ होतात.

काळे मणी हातात घालण्याची फॅशन नवी; मंगळसुत्र ब्रेसलेटच्या १० डिजाईन्स; शोभून दिसेल हात

दुसरा उपाय म्हणजे डब्यामध्ये गरम पाणी भरा. एक डिशवॉशर टॅब्लेट डब्यात घाला. टॅब्लेट पूर्णपणे विरघळू द्या आणि हे मिश्रण डब्यात रात्रभर तसेच ठेवा. सकाळपर्यंत तेल आणि चिकटपणा पूर्णपणे विरघळलेला असेल. त्यानंतर डबा साध्या पाण्याने धुवा.

ब्लाऊजला लावा सुंदर-स्टायलिश लटकन; १० नवीन लटकन डिजाईन्स, मागचा गळा दिसेल आकर्षक

डब्याच्या तेलकट भागावर  थोडे हँड सॅनिटायझर लावा. तेलाचा थर निघेपर्यंत स्वच्छ कापडाने किंवा पेपर टॉवेलने हलक्या हाताने चोळा. काही सेकंदात चिकटपणा निघून जाईल. नंतर डबा साध्या साबणाने धुऊन घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Easy ways to clean greasy plastic containers: Diwali cleaning tips.

Web Summary : Greasy plastic containers can be cleaned easily using baking soda, lemon, vinegar, dish soap, or hand sanitizer. These methods remove oil and odors effectively, making containers fresh for reuse.
टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया