रोजच्या स्वयंपाकात कढईचा वापर नित्यनियमाने केला जातो. भाजी, आमटी किंवा तळणाचे पदार्थ करताना कढईवर तेलाचे थेंब उडणे अगदी साहजिक आहे.(Kitchen grease cleaning hacks) आपण कढई आतून आणि बाहेरुन घासून स्वच्छ करतो, पण अनेकदा कढईच्या हँडलकडे आपण दुर्लक्ष करतो. हँडलच्या आणि कढईच्या जोडणीच्या ठिकाणी हळूहळू तेल, वाफ आणि धूळ साचून एक काळा, चिकट आणि मेणचट थर तयार होतो. (How to remove sticky layer from pans)
अस्वच्छ आणि मेणचट हँडल आपल्या आरोग्यासाठीही तितकेच घातक असते. स्वयंपाक करताना आपला हात सारखा त्या हँडलला लागतो, ज्यामुळे तिथे जमा झालेले जिवाणू अन्नात जाण्याची भीती असते.(Cleaning hacks) बाजारातील महागडे आणि रासायनिक क्लिनर्स वापरल्यास कढईचे हँडल खराब होऊ शकते किंवा स्क्रॅचेस पडू शकतात. पण तासंतास न घासता काही घरगुती सोपे उपाय केल्यास कढईचे हँडल आणि कढई दोन्ही मिनिटांत नव्यासारखी चकाकू लागेल.
दोन चमचे बेकिंग सोडामध्ये एका लिंबाचा रस मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट कढईच्या हँडलवर आणि त्या काळ्या काळ्या कोपऱ्यांमध्ये व्यवस्थित लावा. ५ ते १० मिनिटे हे मिश्रण तसेच राहू द्या. लिंबामधील सायट्रिक अॅसिड आणि सोडामधील रासायनिक प्रक्रियेमुळे तो चिकट थर सैल होईल. त्यानंतर एका जुन्या टूथब्रशने हलके घासून कोमट पाण्याने धुवा.
एका मोठ्या टबमध्ये किंवा पात्रात कढईचे फक्त हँडल बुडेल इतके कडकडीत गरम पाणी घ्या. त्यात अर्धा कप व्हिनेगर आणि एक चमचा डिशवॉश लिक्विड घाला. कढईचे हँडल त्या पाण्यात १५ मिनिटे बुडवून ठेवा. गरम पाणी आणि व्हिनेगरमुळे हँडलवरचे काळे-मेणचट थर निघतील. १५ मिनिटानंतर स्क्रबरने कढई पुसून घ्या.
कढईच्या हँडलवर थोडे हायड्रोजन पेरोक्साईड आणि डिशवॉश जेल एकत्र करुन लावा. त्यावर थोडे कोमट पाणी शिंपडा आणि १० मिनिटे ठेवा. या मिश्रणामुळे कढई आणि त्याच्या हँडलवरील डाग सहज निघण्यास मदत होईल. दरवेळेस कढई घासताना हँडलच्या कोपऱ्यात जुन्या टूथब्रशने थोडे लिक्विड लावून २ सेकंद घासा. जेव्हा आपण कढईत काही तळतो, तेव्हा काम झाल्यावर कढई लगेच कोमट पाण्याने आणि साबणाने धुवा, ज्यामुळे तेलाची वाफ साचून कढईवर घाण साचणार नाही.
Web Summary : Easily remove sticky grease from pan handles with baking soda and lemon, vinegar soak, or hydrogen peroxide. Regular cleaning prevents buildup.
Web Summary : बेकिंग सोडा और नींबू, सिरके के घोल या हाइड्रोजन पेरोक्साइड से कड़ाही के हैंडल से चिपचिपी गंदगी को आसानी से हटाएं। नियमित सफाई से जमाव को रोका जा सकता है।