आपले घर स्वच्छ चकचकीत असायला हवे असे कुणाला वाटत नाही. त्यासाठी आपण घरातील प्रत्येक कोना स्वच्छ करत असतो.(DIY Wash Basin Cleaning Hacks) घरातील बाथरुम, स्वयंपाकघर, किचन सिंक सगळं व्यवस्थित साफ करत असतो. (How to Clean a Dirty Sink with Baking Soda) फरशीवर असलेले पांढरे काळे डाग घालवण्यासाठी देखील अनेक प्रयत्न करतो. परंतु, आपले दुर्लक्ष होते ते घरातील वॉश बेसिंगकडे. याचा वापर आपण चेहरा धुण्यापासून ते दात घासण्यासाठी वापरतो. (Home Remedies for Stubborn Wash Basin Stains)
स्वच्छता राखण्यासाठी या वॉश बेसिंगजवळ अनेक गोष्टी केल्या जातात. (How to Clean Your Sink with Toothpaste and Baking Soda) पण जर आपले वॉश बेसिंग स्वच्छ नसेल तर? याचा आपण दिवसभरात अनेकदा वापर करतो. वॉश बेसिंगजवळ अनेक बॅक्टेरिया जमा असतात.(Expired Toothpaste Cleaning Tips) पाण्याचे पिवळे काळे थर जमा झाल्यामुळे सतत मच्छर आणि माशा फिरत असतात. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. याला साफ करण्यासाठी आपण काही सोप्या ट्रिक्स अवलंबू शकतो.
बाथरुमधल्या बादल्या-मगवर काळे-पिवळे थर जमा झाले? ३ सोपे उपाय, नवीन दिसतील ५ मिनिटात
वॉश बेसिंग स्वच्छ करण्यासाठी पेस्ट
वॉश बेसिंग स्वच्छ करण्यासाठी आपण सगळ्यात आधी पांढर्या रंगाच्या ३ ते ४ गोळ्या घ्यायला हव्या. त्या तोडून त्याची बारीक पेस्ट बनवा. यात १ चमचा टूथपेस्ट घाला. नंतर यात अर्धा चमचा हळद आणि बेकिंग सोडा घाला. ही पेस्ट थोडी पातळ करण्यासाठी त्यात पाणी घाला.
वॉश बेसिंग कसे कराल साफ
तयार केलेली पेस्ट वॉश बेसिंगमध्ये पसरवून घ्या. ब्रशच्या मदतीने २ ते ४ मिनिटे चांगले घासून घ्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ करा. आपले वॉश बेसिंग पुन्हा नव्यासारखे चमकू लागेल. या पेस्टच्या मदतीने आपण स्टीलचे नळ देखील व्यवस्थित स्वच्छ करु शकतो.
पाणी- डिटर्जंटशिवाय धुता येतात जाडजूड ब्लँकेट-रजई, ३ सोप्या टिप्स, भिजवण्याची गरज नाही...
वॉश बेसिंगवरील घाणेरडे डाग काढण्यासाठी सोडा किंवा कोल्ड्रिंकचा वापर करु शकतो. यामुळे बेसिंग चमकण्यास मदत होईल.
तसेच बेकिंग सोडा, व्हिनेगरमुळे बेसिंग स्वच्छ होण्यास मदत होते.
लिंबू कापून ते बेसिंगवर घासून घ्या. त्यावर मीठ टाकून पुन्हा लिंबाने चोळा.यामुळे बेसिंगवर साचलेले काळे आणि पिवळे डाग सहज काढता येतात.