Join us

काही सेकंदातच चमकतील तांब्यांची भांडी, घासण्याचीही गरज नाही- फक्त 'या' जादुई पाण्यात टाकून कमाल पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2024 12:57 IST

Easy And Simple Method Of Cleaning Copper Utensils: तांब्याची भांडी न घासता अगदी चकाचक करायची ही ट्रिक एकदा पाहूनच घ्या... प्रत्येक घरामध्येच ती खूप उपयोगी ठरणारी आहे. (how to clean copper utensils within few seconds)

ठळक मुद्देहा उपाय करण्यासाठी तुम्हाला ते भांडं घासण्याची अजिबातच गरज नाही. अगदी काही क्षणांतच तांब्याची भांडी चकाचक कशी करायची ते पाहा...

तांब्याची भांडी प्रत्येक घरामध्ये असतातच. सणावाराला ती लागतातच. किंवा काही घरांमध्ये दररोज देवपुजेसाठीही ही भांडी लागतात. बऱ्याच घरामध्ये दररोज पाणी पिण्यासाठीही तांब्याची भांडी वापरली जातात. कारण त्या भांड्यामधलं पाणी आरोग्यदायी असतं. पण तांब्याची भांडी स्वच्छ करण्याचं काम अनेकींना खूप किचकट वाटतं. कारण या भांड्यांवर अगदी पाण्याचे काळपट डागही लगेच पडतात (easy and simple method of cleaning copper utensils). म्हणूनच तुमचं हे काम अगदी सोपं कसं करायचं ते पाहा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ते भांडं घासण्याची अजिबातच गरज नाही. अगदी काही क्षणांतच तांब्याची भांडी चकाचक कशी करायची ते पाहा... (how to clean copper utensils within few seconds)

 

तांब्याची भांडी स्वच्छ करण्याचा सोपा उपाय

तांब्याची भांडी न घासता अगदी स्वच्छ- चकाचक कशी करायची, याचा एक सोपा उपाय suvarna_lonare24 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

पित्ताशयात खडे झाल्यामुळे भारती सिंह रुग्णालयात, ५ चुकीच्या सवयींमुळेही होतो हा आजार- बघा लक्षणं

हा उपाय करण्यासाठी आपल्याला २ चमचे सायट्रिक ॲसिड किंवा लिंबू सत्व आणि २ चमचे मीठ लागणार आहे.

सगळ्यात आधी एका भांड्यात २ चमचे सायट्रिक ॲसिड किंवा लिंबूसत्व आणि २ चमचे मीठ टाका. आता तुम्हाला तांब्याची किती भांडी स्वच्छ करायची आहेत, यावरून हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता.

 

या भांड्यात आता २ ग्लास कोमट पाणी टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.

तेलाची बरणी आतून तेलकट- चिकट झाली? १ सोपा उपाय- कमी मेहनतीत बाटली होईल चकाचक 

पाण्यामध्ये लिंबूसत्व आणि मीठ पुर्णपणे विरघळले की तुम्हाला जी तांब्याची भांडी स्वच्छ करायची आहेत, ती भांडी या पाण्यात काही सेकंदासाठी बुडवून ठेवा. जसं तुम्ही भांडं बुडवाल तसं अगदी पुढच्या काही सेकंदातच त्याच्यावरचा काळपटपणा कमी होऊन ते चमकून उठेल.

यानंतर पुन्हा एकदा भांडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि लगेच पुर्णपणे पुूसून कोरडी करून टाका. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स