हल्ली आरोग्याबाबत बरेच लोक जागरुक झाले आहेत. त्यामुळे जसा बदल त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होत आहे तसाच बदल स्वयंपाक करण्याच्या पद्धतींमध्येही होत आहे. आता हेच पाहा ना आतापर्यंत ॲल्युमिनियम, हॅण्डालियम, स्टीलच्या कढईमध्ये स्वयंपाक केला जात होता. पण आता मात्र अनेक ठिकाणी रोजच्या स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात आहे. एवढेच नाही तर रोजचे दही लावण्यासाठी, दूध तापविण्यासाठीही मातीची भांडी वापरली जातात. मातीची भांडी अधिक आरोग्यदायी मानली जातात त्यामुळे हा बदल बरेच लोक करत आहेत (2 important tips while using clay pot for cooking). पण तसं करत असताना मातीच्या भांड्यांच्या स्वच्छतेकडेही लक्ष देण्याची गरज आहे (how to clean cooking clay pot?). नाहीतर आरोग्यदायी असणारी मातीची भांडी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, असं तज्ज्ञ सांगतात.(Right way to Clean & Maintain Clay Pots)
मातीच्या भांड्यांची स्वच्छता कशी करावी?
मातीच्या भांड्यांची स्वच्छता कशी करावी तसेच मातीची भांडी वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ swadcooking and chefsnehathakkar या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
शरीरातलं व्हिटॅमिन D नैसर्गिकपणे वाढविण्याचे ३ उपाय- कॅल्शियम, व्हिटॅमिन B12 सुद्धा वाढेल
यामध्ये तज्ज्ञ असं सांगत आहेत की मातीची भांडी वापरण्यासाठी कधीही नेहमीचे डिशवॉश लिक्विड किंवा भांडे घासण्याची साबण वापरू नये. कारण त्या साबणामध्ये, डिटर्जंटमध्ये अनेक केमिकल्स असतात जे मातीच्या भांड्यांना असलेल्या छिद्रांमध्ये अडकून बसतात. अन्न शिजवताना ते अन्नामध्ये मिसळण्याचा धोका असतो.
मातीची भांडी स्वच्छ करण्यासाठी त्यामध्ये गरम पाणी आणि थोडा लिंबाचा रस घालून ठेवावा. पाणी थंड झाले की ते भांड्यातून काढून टाका. यानंतर त्या भांड्यात थोडं मीठ आणि थोडं तांदळाचं पीठ घाला आणि स्क्रबर वापरून ते घासा. यानंतर भांडं स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवायला ठेवा.
दही खूप आंबट झाल्यास काय करावं? २ टिप्स- आंबटपणा जाऊन दही होईल गोड
भांडं वाळवून झालं की त्याला तेलाचा हात लावा आणि पुन्हा ८ ते १० तासांसाठी ते तसेच राहू द्या. यानंतर तुम्ही त्या भांड्यात स्वयंपाक करू शकता. मातीच्या भांड्याची स्वच्छता करायची असेल तर एवढी काळजी घ्यावीच लागेल, असं तज्ज्ञ सांगतात.