'तवा' स्वयंपाक घरात सगळ्यात जास्त आणि दररोज वापरल्या जाणाऱ्या भांड्यांपैकी एक आहे. 'तवा' म्हटलं की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे (easy way to clean Aluminum utensils) तवे असतात. नॉनस्टिक तवा, स्टील, अॅल्युमिनियम अशा वेगवेगळ्या मटेरियलपासून तयार केलेल्या तव्यांचा वापर आपण करतो. यातही, अॅल्युमिनियमच्या तव्याचा वापर (How to clean aluminium tawa in 10 mins) हा अधिक जास्त प्रमाणात केला जातो. अॅल्युमिनियमच्या तव्यावर (How to Clean Aluminium Tawa) आपण चपात्या भाजण्यापासून ते पदार्थ तळण्यापर्यंत, अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरतो. अशा पद्धतीने, सततच्या वापराने अॅल्युमिनियमचा तवा संपूर्णपणे काळाकुट्ट होऊन जातो(How to clean black burnt aluminium tawa at home).
अॅल्युमिनियमच्या तव्यावर तेलाचे व मसाल्यांचे डाग पडल्यामुळे काळपट थर जमा होतो. यामुळे तवा नुसता खराबच दिसत नाही तर, आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकतो. यासाठीच, हा अॅल्युमिनियमचा तवा वेळच्यावेळी घासून स्वच्छ करणे गरजेचे असते. अॅल्युमिनियमचा तवा वेळीच घासून स्वच्छ केला नाही तर तो कालांतराने काळाकुट्ट दिसू लागतो. अनेकदा साबण व लिक्विड सोप वापरून देखील हा काळाकुट्ट तवा काही केल्या स्वच्छ होत नाही, अशा तव्यावरील साचलेला काळाकुट्ट थर काढणे फार अवघड असते. यासाठीच, अॅल्युमिनियमचा तवा पुन्हा नव्यासारखा स्वच्छ दिसावा तसेच त्यावरील काळाकुट्ट थर सहजपणे काढता येण्यासाठी सोपी ट्रिक पाहूयात. ही भन्नाट घरगुती ट्रिक वापरून आपण अगदी सहज पद्धतीने, अॅल्युमिनियमचा काळाकुट्ट तवा स्वच्छ करु शकतो.
अॅल्युमिनियमच्या तव्यावरील साचलेला काळाकुट्ट थर काढून टाकण्यासाठी...
अॅल्युमिनियमच्या तव्यावरील साचलेला काळाकुट्ट थर काढून टाकण्यासाठी, फारशी मेहेनत न घेता किंवा घासणीने खूप घासाघीस न करता झटपट सोप्या पद्धतीने नव्यासारखा लख्ख करण्यासाठी खास उपाय पाहूयात. अॅल्युमिनियमच्या तव्यावरील साचलेला काळा थर काढून टाकण्यासाठीचा उपाय homecheff_renu या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अॅल्युमिनियमचा तवा स्वच्छ करण्यासाठी ग्लासभर पाणी, प्रत्येकी १ टेबलस्पून डिटर्जंट पावडर, बेकिंग सोडा, ३ ते ४ टेबलस्पून लिंबाचा रस आणि लिंबाच्या साली इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
कमोड-वॉश बेसिनवरचे पिवळे डाग झटपट गायब करणारा चहा पावडरचा उपाय, बाथरुम चकाचक...
बाथरुमच्या पाईपमध्ये केसांचा गुंता अडकून चोकअप होते? ३ ट्रिक्स, पाणी तुंबणार नाही...
नेमकं करायचं काय ?
सगळ्यातआधी, अॅल्युमिनियमचा तवा गॅसवर ठेवून व्यवस्थित गरम करून घ्यावा. तवा नीट गरम झाल्यावर त्यात ग्लासभर पाणी ओतावे. त्यानंतर, हे पाणी चांगले गरम होऊ द्यावे, पाण्याला उकळी आल्यावर यात प्रत्येकी १ टेबलस्पून डिटर्जंट पावडर, बेकिंग सोडा, ३ ते ४ टेबलस्पून लिंबाचा रस आणि लिंबाच्या साली घालाव्यात. त्यानंतर हे सगळे मिश्रण चमच्याने हलवत तव्यावर ५ ते १० मिनिटे तसेच ठेवून द्यावे. मग काटा चमच्याच्या टोकांवर लिंबाच्या साली खोचून घेऊन त्याने तव्यावरील काळपट, चिकट थर घासून घ्यावा. मिश्रणाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून ते मिश्रण तव्यात १० ते १५ मिनिटे तसेच ठेवून द्यावे. मग हे पाणी ओतून तवा नेहमीप्रमाणे स्वच्छ धुवून घ्यावा. यानंतर आपण फरक बघू शकता, काळाकुट्ट झालेला अॅल्युमिनियमचा तवा स्वच्छ होऊन त्यावरील साचलेला काळा थर सहजपणे काढला जाऊन, तवा पुन्हा पहिल्यासारखा चकचकीत होतो.