Lokmat Sakhi >Social Viral > घासणी किंवा चमच्याने खरवडण्याची गरज नाही, कुकरच्या तळाशी करपून चिकटलेला भात निघेल सहज - भन्नाट ट्रिक...

घासणी किंवा चमच्याने खरवडण्याची गरज नाही, कुकरच्या तळाशी करपून चिकटलेला भात निघेल सहज - भन्नाट ट्रिक...

How to Clean a Burnt Pot or Pan with Baking Soda & Vinegar : How to remove burned food from a cooker without scouring : Simple Tricks And Ways For Cleaning Burnt Steel Cookware : भात करपून कुकरच्या तळाशी चिकटला तर तासंतास न घासता, वापरा ही सहजसोपी ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2025 19:30 IST2025-03-05T19:18:43+5:302025-03-05T19:30:14+5:30

How to Clean a Burnt Pot or Pan with Baking Soda & Vinegar : How to remove burned food from a cooker without scouring : Simple Tricks And Ways For Cleaning Burnt Steel Cookware : भात करपून कुकरच्या तळाशी चिकटला तर तासंतास न घासता, वापरा ही सहजसोपी ट्रिक...

How to Clean a Burnt Pot or Pan with Baking Soda & Vinegar How to remove burned food from a cooker without scouring | घासणी किंवा चमच्याने खरवडण्याची गरज नाही, कुकरच्या तळाशी करपून चिकटलेला भात निघेल सहज - भन्नाट ट्रिक...

घासणी किंवा चमच्याने खरवडण्याची गरज नाही, कुकरच्या तळाशी करपून चिकटलेला भात निघेल सहज - भन्नाट ट्रिक...

'भात' हा आपल्या रोजच्या जेवणातील मुख्य अन्नपदार्थ आहे. काहीजणांना जेवणाच्या ताटात भात असल्याशिवाय जेवणच जात नाही. यासाठी आपण नेहमीच कुकरमध्ये भात शिजवतो. परंतु भात शिजवणे वाटते तितके सोपे काम नाही. कुकरमध्ये भात शिजवतांना तो कधी गचका होतो तर कधी पाणी कमी होऊन तो करपून जातो. असा करपलेला भात हा कुकरच्या तळाशी जाऊन चिकटतो. मग असा काळाकुट्ट झालेला आणि कुकरच्या तळाशी चिकटलेला भात काढणे म्हणजे मोठे अवघड काम(How to remove burned food from a cooker without scouring).

कुकरच्या तळाशी चिकटलेला भात काढण्यात बराच वेळ खर्ची होतो. अशावेळी आपण चमचा, घासणी किंवा इतर टोकदार वस्तूंच्या मदतीने हा भात खरवडून काढण्याचा प्रयत्न करतोच. परंतु काहीवेळा इतके कष्ट घेऊन देखील हा तळाशी चिकटलेला भात निघत नाही. हा भात संपूर्णपणे काढून कुकर स्वच्छ धुतल्याशिवाय (Simple Tricks And Ways For Cleaning Burnt Steel Cookware) आपण त्यात दुसरे अन्नपदार्थ देखील शिजवू शकत नाही. अशावेळी काय करायचे हे नेमकं त्या गृहिणीला सुचत नाही. पण कुकरच्या तळाशी चिकटलेला हा भात (How to Clean a Burnt Pot or Pan with Baking Soda & Vinegar) खरवडून न काढता देखील अगदी सहजपणे काढण्याची एक भन्नाट ट्रिक आहे. ही ट्रिक वापरून तुम्ही घासणीचा वापर न करता देखील अगदी मिनिटभरात जळका कुकर स्वच्छ करुन, कुकरच्या तळाशी चिकटलेला भात काढू शकता. पाहा मग नेमकं करायचं काय... 

भात करपून कुकरच्या तळाशी जाऊन चिकटला तर काय करावं? 

१. सर्वात आधी कुकरच्या किंवा कोणत्याही भांड्याच्या तळाशी भात चिकटला असेल तर तो चमच्याने खरवडून काढण्याची चूक करु नका. असे केल्याने भांड्यावर ओरखडे पडून भांडे खराब होण्याची शक्यता असते. 

२. यासाठी सर्वात आधी या जळक्या पृष्ठभावर मीठ ओतून मिठाचा एक जाडसर असा थर लावून घ्यावा. 

लेदरच्या वस्तूंपासून ते गाडीवरच्या स्क्रॅचेसपर्यंत, महागडे उपाय नको - खोबरेल तेल व्हिनेगरचा पाहा इन्स्टंट उपाय...

३. त्यानंतर त्यावर थोडे व्हिनेगर सगळ्या बाजुंला पसरेल असे ओतावे. 

४. सगळ्यात शेवटी यात अर्धे भांडे भरेल इतके पाणी ओतावे आणि ते भांडे गॅसवर ठेवून मध्यम आचेवर १० ते १५ मिनिटे ठेवून द्यावे. या भांड्यातील सगळ्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यावी. 

कुल है बाॅस! चमचाभर बडीशेप-चिमूटभर खडीसाखरेचं सरबत प्या, उन्हाळा एकदम गारेगार होऊन जाईल!

५. उकळी आल्यानंतर चमच्याच्या मदतीने हलकेच हलवून तळाशी चिकटलेला भात काढून घ्यावा. त्यानंतर बेसिनमध्ये एक मोठी गाळण ठेवून त्यात या भांड्यातील पाणी ओतून सगळा भात गाळून घ्यावा.

६. आता कुकरच्या किंवा भांडयाच्या तळाशी करपून चिकटलेला भात सहजपणे निघाला असेल. त्यानंतर नेहमीप्रमाणे लिक्विड सोप किंवा साबणाच्या मदतीने हे भांड स्वच्छ घासून घ्यावे. 

अशाप्रकारे आपण कुकरच्या किंवा भांड्याच्या तळाशी करपून चिकटलेला भात न खरवडता देखील अगदी सहजपणे फारशी मेहेनत न घेता काढू शकता.


Web Title: How to Clean a Burnt Pot or Pan with Baking Soda & Vinegar How to remove burned food from a cooker without scouring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.