Lokmat Sakhi >Social Viral > तुम्ही कधी सिलेंडरची एक्सपायरी डेट चेक केली आहे का? ‘अशी’ तपासा, घर सुरक्षित ठेवा...

तुम्ही कधी सिलेंडरची एक्सपायरी डेट चेक केली आहे का? ‘अशी’ तपासा, घर सुरक्षित ठेवा...

How to check your LPG cylinder due date : How to Check the Expiry Date of LPG Cylinder, Check Here : How to know the expiry date of your gas cylinder : कशी ओळखावी सिलिंडरची एक्स्पायरी डेट? जाणून घ्या....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2025 20:57 IST2025-04-26T20:44:35+5:302025-04-26T20:57:02+5:30

How to check your LPG cylinder due date : How to Check the Expiry Date of LPG Cylinder, Check Here : How to know the expiry date of your gas cylinder : कशी ओळखावी सिलिंडरची एक्स्पायरी डेट? जाणून घ्या....

How to check your LPG cylinder due date How to Check the Expiry Date of LPG Cylinder, Check Here How to know the expiry date of your gas cylinder | तुम्ही कधी सिलेंडरची एक्सपायरी डेट चेक केली आहे का? ‘अशी’ तपासा, घर सुरक्षित ठेवा...

तुम्ही कधी सिलेंडरची एक्सपायरी डेट चेक केली आहे का? ‘अशी’ तपासा, घर सुरक्षित ठेवा...

आपल्या स्वयंपाक घरात अशा काही मोजक्याच वस्तू असतात, ज्यांचा वापर अगदी दररोज होतोच. गॅस सिलिंडर, शेगडी या त्यापैकीच दोन महत्वाच्या वस्तू आहेत. या दोन्ही गोष्टी अगदी काळजीपूर्वक व बारकाईने हाताळाव्या लागतात. घरातील गॅस सिलिंडर, शेगडीची आपण अनेक प्रकारे काळजी घेतोच. असे असले तरीही त्याची एक्स्पायरी डेड आपल्याला ठाऊकच नसते(How to check your LPG cylinder due date).

गॅस सिलिंडर, शेगडी अशा वस्तूंमुळे खूप मोठी दुर्घटना घडू शकते. काहीजणांना प्रत्येक गोष्ट हाताळताना त्याची एक्स्पायरी डेड बघण्याची सवय असते, पण कधी गॅस सिलिंडरची एक्स्पायरी डेट (How to Check the Expiry Date of LPG Cylinder, Check Here) तपासून पाहिली आहे का ? होय, आपल्या दररोजच्या वापरातील गॅस सिलेंडरला देखील एक्स्पायरी डेट असते. पण ती नेमकी कुठे दिलेली असते? कशी ओळखायची? कुठे तपासून पाहायची ? याबद्दल गृहिणींना फारशी माहिती नसते. यासाठीच गॅस सिलिंडर घेताना सर्वात आधी त्याची एक्सपायरी डेट कशी तपासून पहावी याची सोपी ट्रिक पाहूयात(How to know the expiry date of your gas cylinder).

सिलिंडरची एक्सपायरी डेट कशी तपासायची ?

सिलिंडरच्या वर जी उभी लोखंडी पट्टी आहे, त्यावर इंग्रजी अक्षर आणि अंक लिहिलेला असतो. हे कोडमध्ये लिहिलेले असते. यालाच त्या सिलिंडरची एक्स्पायरी डेट म्हणतात. जर तुमच्या गॅस सिलिंडरवर A-२५ लिहिले असेल, तर याचा अर्थ हे सिलिंडर जानेवारी २०२५ मध्ये संपेल. त्यावर लिहिलेली A ते D अक्षरे महिन्याची माहिती देतात आणि संख्या वर्षाची माहिती देते.

घरभर झुरळं फिरतात? ‘हा’ खास उपाय करा, एक झुरळ घरात दिसणार नाही-कायमचा बंदोबस्त...

या कोडमध्ये, ABCD प्रत्येकी तीन महिन्यांत विभागलेले असते. A म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. त्याचप्रमाणे B म्हणजे एप्रिल, मे आणि जून. त्याचप्रमाणे C म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि D म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. आता जर तुमच्या सिलिंडरवर A- २५ लिहिलेले असेल, तर त्याचा अर्थ तुमचा सिलिंडर २०२५ मध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान संपेल.    

तांदुळाचे पाणी फक्त चेहऱ्यालाच लावू नका! घराच्या कानाकोपऱ्यांची करा स्वच्छता - कपभर पाणी करेल घर लख्ख...

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सिलिंडरची एक्सपायरी डेट जाणून घेऊ शकता. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, एक्सपायरी डेट का लिहिली जाते? तर, सिलिंडरवर लिहिलेल्या या तारखा टेस्टिंग डेट्स असतात. याचा अर्थ असा की, या तारखेला सिलिंडर चाचणीसाठी पाठवला जातो. सिलिंडर पुढील वापरासाठी योग्य आहे की नाही, हे पाहिले जाते. सिलिंडर तपासताना त्याची हायड्रो टेस्ट केली जाते. चाचणी दरम्यान मानकांची पूर्तता न करणारे सिलिंडर नष्ट केले जातात.

एलपीजी गॅस सिलिंडरचे आयुष्य १५ वर्षे असते. यादरम्यान सिलिंडर दोनदा चाचणीसाठी पाठवला जातो. पहिली चाचणी १० वर्षांनी आणि दुसरी चाचणी  ५ वर्षांनी केली जाते. आता तुम्हाला सिलिंडरच्या एक्सपायरी विषयी बरीच माहिती मिळाली असेल. तर, पुढच्यावेळी तुमच्या घरात आलेल्या सिलिंडरची एक्सपायरी डेट तपासून घ्या.


Web Title: How to check your LPG cylinder due date How to Check the Expiry Date of LPG Cylinder, Check Here How to know the expiry date of your gas cylinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.