Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > नवा माठ गळका निघू नये म्हणून लक्षात ठेवा ८ छोट्या गोष्टी! निवडा गारेगार पाणी देणारा उत्तम माठ...

नवा माठ गळका निघू नये म्हणून लक्षात ठेवा ८ छोट्या गोष्टी! निवडा गारेगार पाणी देणारा उत्तम माठ...

how to check clay pot for leaks : how to choose a good clay pot : माठ गळका निघेल की नाही ते विकत घेण्यापूर्वी तपासण्याच्या स्मार्ट ट्रिक्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2026 16:26 IST2026-03-27T15:03:05+5:302026-03-28T16:26:21+5:30

how to check clay pot for leaks : how to choose a good clay pot : माठ गळका निघेल की नाही ते विकत घेण्यापूर्वी तपासण्याच्या स्मार्ट ट्रिक्स...

how to check clay pot for leaks how to choose a good clay pot how to identify good quality matka | नवा माठ गळका निघू नये म्हणून लक्षात ठेवा ८ छोट्या गोष्टी! निवडा गारेगार पाणी देणारा उत्तम माठ...

नवा माठ गळका निघू नये म्हणून लक्षात ठेवा ८ छोट्या गोष्टी! निवडा गारेगार पाणी देणारा उत्तम माठ...

रणरणत्या उन्हाच प्रमाण वाढू लागल की, फ्रिजच्या पाण्यापेक्षा मातीच्या माठातील नैसर्गिकरीत्या थंड झालेलं पाणी पिण्याची ओढ सर्वांनाच लागते. माठातलं पाणी केवळ तृष्णा शमवत नाही, तर ते आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असतं. त्यामुळेच दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला आपण आवर्जून नवीन माठ विकत आणतो. परंतु, अनेकदा उत्साहात माठ घरी आणल्यानंतर लक्षात येतं की, तो कुठेतरी गळतोय किंवा त्यातून पाणी पाझरत आहे. उन्हाळा सुरू झाला की थंडगार आणि नैसर्गिकरीत्या (how to identify good quality matka) गार झालेले पाणी पिण्यासाठी मातीचा माठ हा प्रत्येकाच्या घरातील आवडता पर्याय ठरतो. मात्र, माठ खरेदी करताना थोडेसे जरी दुर्लक्ष झाले तरी तो गळका निघण्याची शक्यता असते, ज्यामुळे पाणी साठवणे कठीण होते(best matka for summer water storage).

काही वेळा मातीच्या माठाला बारीक तडा जातो, जो डोळ्यांना चटकन दिसत नाही, तर कधी मातीचा दर्जा चांगला नसल्याने माठ गळका निघतो. अशावेळी पैसे आणि वेळ दोन्ही वाया जातात. म्हणूनच, माठ विकत घेताना तो नक्की कसा तपासून पाहावा? मातीच्या माठाची 'परख' कशी करावी? आणि गळका माठ ओळखण्याच्या सोप्या युक्त्या कोणत्या? त्यामुळे मातीचा माठ (how to check clay pot for leaks) विकत घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणे अत्यावश्यक ठरते. योग्य माठ (how to choose a good clay pot) निवडल्यास तो दीर्घकाळ टिकतो आणि उन्हाळ्यात थंड पाण्याचा आनंदही मिळतो.

मातीचा माठ गळका निघू नये म्हणून 'या' ८ गोष्टी तपासून पहा... 

१. आवाजावरून ओळखा :- माठ गळका आहे की नाही ते तपासण्यासाठी बोटाने माठावर हलकेच टिचकी मारून किंवा ठोकून पहा. जर माठातून 'खणखणीत' आणि घुमणारा आवाज आला, तर समजावे की माठ अगदी योग्य आहे. पण जर आवाज दबलेला किंवा कंपन नसलेला येत असेल, तर त्या माठाला कुठे तरी छिद्र किंवा तडा असण्याची शक्यता असते.

महागड्या साडीवर पडलेला डाग काढण्याची भन्नाट युक्ती, ड्रायक्लिनिंगची गरज नाही-१ पैशाचा खर्च नाही...

२. पाणी भरून खात्री करा :- जर तुम्हाला आवाजावरून शंका येत असेल, तर माठ घेण्यापूर्वी त्यात एकदा पाणी भरून पहा. पाणी भरलेला माठ एखाद्या कोरड्या जागेवर ठेवा आणि ५ मिनिटांनी निरीक्षण करा. जर माठाच्या खालून किंवा बाजूने पाणी झिरपताना दिसत असेल, तर तो माठ गळका आहे हे स्पष्ट होईल. शक्य असल्यास माठाच्या पृष्ठभागावर पाण्याचा ओला हात फिरवा. जर पाणी लावल्याबरोबर मातीचा गोड सुगंध आला आणि पाणी पटकन शोषले गेले, तर तो माठ नैसर्गिक आणि चांगल्या मातीचा आहे असे समजावे.

३. नीट भाजलेला माठ विकत घ्यावा :- माठ खरेदी करताना तो योग्य पद्धतीने भाजलेला असणे खूप महत्त्वाचे असते. तो कच्चा किंवा अतिभाजलेला नसावा. जर माठ नीट भाजलेला नसेल आणि खूपच कच्चा वाटत असेल, तर तो लवकर फुटण्याची किंवा त्याला तडे जाण्याची भीती असते. असा माठ जास्त काळ टिकत नाही. ज्या माठावर खूप जास्त काळे डाग दिसतात किंवा जो खूप जास्त भाजलेला असतो, त्यात पाणी जास्त थंड होत नाही. अशा माठाची छिद्र 'बंद' झालेली असतात, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन नीट होत नाही. शक्यतो जुन्या पद्धतीचे, पारंपरिक पद्धतीने बनवलेले माठच निवडावेत. जे माठ मध्यम भाजलेले असतात, ते अधिक काळ टिकतात आणि त्यातलं पाणीही नैसर्गिकरीत्या छान थंड राहतं.

चमचाभर बडीशेप करेल केस काळेभोर! स्वस्तात मस्त 'केमिकल-फ्री' हेअरडाय - कमी खर्चात पार्लरसारखा लूक...

४. पेंट किंवा डिझाइनर माठ खरेदी करणे टाळा :- बाजारात मिळणारे अधिक रंगीत आणि नक्षीकाम केलेले माठ दिसायला खूप आकर्षक असतात. मात्र, यावर रासायनिक रंगांचा वापर केलेला असतो. मातीचा माठ पाणी थंड करतो कारण त्याच्या पृष्ठभागावर अत्यंत सूक्ष्म छिद्रे असतात. जेव्हा आपण माठाला बाहेरून पेंट करतो, तेव्हा हे रंग त्या छिद्रांना पूर्णपणे बंद करून टाकतात. छिद्रे बंद झाल्यामुळे बाष्पीभवन नीट होत नाही आणि परिणामी माठातील पाणी हवे तसे थंड राहत नाही. पाण्याचा नैसर्गिक थंडावा हवा असेल, तर शक्यतो साधा आणि नैसर्गिक रंगाचा माठ खरेदी करण्यालाच प्राधान्य द्या.

५. माठाचा रंग तपासा :- जो माठ फिकट लाल, विटकरी, तपकिरी किंवा बदामी रंगाचा असतो, तो नैसर्गिक मातीपासून बनलेला असतो. अशा माठात पाण्याचा नैसर्गिक थंडावा आणि मातीचा सुवास टिकून राहतो. अनेकदा बाजारात खूप जास्त गडद लाल किंवा अत्यंत चमकदार दिसणारे माठ मिळतात. हे माठ आकर्षक दिसण्यासाठी त्यावर रासायनिक रंग किंवा पॉलिशचा वापर केलेला असू शकतो. अशा पॉलिश केलेल्या माठांमधील सूक्ष्म छिद्रे बंद झाल्यामुळे पाणी जास्त थंड होत नाही. इतकेच नाही तर, त्यातील रसायने हळूहळू पाण्यात मिसळून तुमच्या शरीरात जाऊ शकतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

थंडगार उसाचा रस की स्लो पॉयझन? 'या' ५ समस्या असतील तर स्त्रियांनी उसाचा रस पिणं फार धोक्याचं...

६. माठ वापरण्यापूर्वीची मिठाची ट्रिक :- नवीन माठ घरी आणल्यावर तो थेट वापरू नका. आधी तो २४ तास साध्या पाण्यात बुडवून ठेवा. त्यानंतर त्यात थोडे खडे मीठ टाकून पाणी भरा आणि ते पाणी फेकून द्या. यामुळे माठाची छिद्रे मोकळी होतात आणि पाणी जास्त थंड व्हायला मदत होते.

७. नळ असलेला माठ घेताना काळजी घ्या :- आजकाल नळ असलेले माठ मिळतात. अशावेळी नळ जिथे बसवला आहे, त्या भागाला सिमेंट किंवा एम-सीलने नीट पॅक केले आहे का ते तपासा. कारण बहुतांश वेळा लिकेज हे नळाच्या भागातूनच सुरू होते.

८. आतला पृष्ठभाग गुळगुळीत असावा :- खूप खडबडीत पृष्ठभाग असलेला माठ पाणी शोषून घेतो आणि लवकर गळका होऊ शकतो. माठाच्या आत आणि बाहेर नीट पाहा. अगदी बारीक भेग असेल तरी पुढे हा माठ गळका निघू शकतो.

Web Title : सही मटका खरीदें: रिसाव से बचने के लिए 8 सुझाव।

Web Summary : ठंडा पानी पाने के लिए सही मिट्टी का मटका चुनें! ध्वनि, रिसाव, पकाई और रंग की जाँच करें। अत्यधिक रंगीन बर्तनों से बचें। नए बर्तनों को नमकीन पानी में भिगोएँ। नल की फिटिंग और आंतरिक सतह का निरीक्षण करें।

Web Title : Buy the perfect earthen pot: 8 tips to avoid leaks.

Web Summary : Choose the right earthen pot for cool water! Check for sound, leaks, baking, and paint. Avoid overly colored pots. Soak new pots in saltwater. Inspect tap fittings and inner surface.