Join us

Gudhi Padva 2025: गुढी उभारण्याआधी ६ गोष्टींची तयारी करा, ऐनवेळी धांदल उडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2025 16:33 IST

Gudhi Padva 2025: गुढी उभारताना ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून या काही गोष्टींची तयारी अगोदरच करून ठेवा...(6 tips for the celebration and preparation for gudhi padva festival) 

ठळक मुद्दे एवढी जय्यत तयारी असेल तर मग गुढी उभारण्याचे काम एकदम सोपे होऊन जाईल. 

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस (Gudhi Padva 2025). शिवाय गुढीपाडवा म्हणजे अतिशय शुभ समजल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक. त्यामुळे हा सण अतिशय उत्साहात, आनंदात साजरा केला जातो. ज्याप्रमाणे प्रत्येक सणाच्या दिवशी घरातल्या महिलांच्या मागे गडबड असते, तशीच धावपळ- गडबड गुढीपाडव्याच्या दिवशीसुद्धा असतेच. गुढी उभारायची, तिला साडी नेसवायची, गुढी उभारण्याची जागा सुशोधित करायची, स्वयंपाकाचे बघायचे अशी सगळी कामे घरातल्या महिलांना पुढे होऊन करावी लागतात (6 tips for the celebration and preparation for gudhi padva festival). त्यामुळे मग काहीतरी सुटते. काहीतरी राहून जाते आणि ऐनवेळी गोंधळ उडतो. म्हणूनच असं होऊ नये यासाठी काय तयारी आगोदरच करून ठेवावी ते पाहूया..(how to do gudhi padva poojan?)

 

गुढी उभारण्यासाठी कशी तयारी करून ठेवावी?

१. गुढी उभारण्यासाठी आपल्याला काही गोष्टी प्रामुख्याने लागतात. त्यापैकी एक म्हणजे गुढीच्या वरच्या भागात लावण्यासाठी तांब्याचा, पितळेचा, स्टीलचा कलश किंवा फुलपात्र. ते भांडे आगोदरच पाहून ठेवा आणि घासून स्वच्छ करून घ्या.

Gudhi Padva 2025: गुढीसमोर कैरी ठेवण्याला एवढं महत्त्व का? बघा कैरी खाण्याचे ५ फायदे

२. गुढी उभारण्यासाठी एक उंच काठीही लागतेच. ती काठीही शक्य झालं तर आदल्या दिवशी रात्रीच शोधून ठेवा आणि ओल्या कपड्याने पुसून स्वच्छ करा. जेणेकरून दुसऱ्या दिवशी त्यामध्ये वेळ जाणार नाही. 

३. गुढीला कुठली साडी नेसवणार आहात ती साडी देखील आधीच काढून ठेवा. साडीची निवड करताना ती वजनाने हलकी असावी याची काळजी घ्या. जेणेकरून काठीला तिचा भार पेलू शकेल.

 

४. काठीला साडी बांधण्यासाठी एखादी सुतळी किंवा जाड दोरा गरजेचा असतो. तो सुद्धा अगोदरच बघून ठेवा. कारण बऱ्याचदा अशा लहानसहान गोष्टी चटकन सापडत नाहीत आणि मग ऐनवेळी बरीच शोधाशोध करावी लागते.

'या' एका ग्लासमध्ये लपलं आहे दीपिका पदुकोनच्या सौंदर्याचं रहस्य, तिच्या डाएटीशियन सांगतात.....

५. गुढी पाटावर किंवा चौरंगावर उभारली जाते. त्यामुळे तो पाट किंवा चौरंग आणि त्यावर कोणते आसन घालायचे आहे हे देखील पाहून ठेवा.  

६. यानंतर गुढीची पूजा करण्यासाठी हार, फुलं, गाठी, दिवा, उदबत्ती, धूप, आंब्याच्या पानांचे डगळे, कडुलिंबाची पाने, विड्याचे पान, सुपारी अशा सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव आधीच करून ठेवा. एवढी जय्यत तयारी असेल तर मग गुढी उभारण्याचे काम एकदम सोपे होऊन जाईल. 

 

टॅग्स :गुढीपाडवाकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.