Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनेक दिवस तिच मळकट बेडशीट, उशीची खोळ वापरणं धोक्याचं - पाहा किती दिवसांनी बदलणं गरजेचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:10 IST

Bed sheets Cleaning Tips : अनेकदा घराच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिलं जातं. पण बेडशीट आणि उशीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं. जर आपण वेळोवेळी बेडशीट बदलली नाही तर आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Bed sheets Cleaning Tips : बेड हा घरातील झोपण्याचं एक साधन नसून सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. बऱ्याच लोकांचा जास्तीत जास्त वेळ हा त्यांच्या बेडवरच जातो. त्यामुळे बेडची स्वच्छता हा खूप महत्वाचा विषय ठरतो. अनेक एक्सपर्ट नेहमीच याबाबत सांगत असतात. आपणही जास्त वेळ बेडवर घालवत असाल किंवा बेडचा वापर केवळ झोपण्यापुरताच करत असाल तरी सुद्धा बेडशीट किंवा उशींचे कव्हर आपण किती दिवसांनी बदलायला हवेत? हे माहीत असणं फार गरजेचं आहे.

अनेकदा घराच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिलं जातं. पण बेडशीट आणि उशीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं. मुळात त्वचेसाठी आणि एकंदर आरोग्यासाठी तेही तेवढंच महत्वाचं असतं. जर आपण वेळोवेळी बेडशीट बदलली नाही तर आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारण यात कोट्यावधी बॅक्टेरिया असतात. त्यामुळे बेडशीट किती दिवसात स्वच्छ केली पाहिजे आणि किती दिवसात बदलली पाहिजे याबाबत जाणून घेऊ.

बरेच लोक आपला वेळ बेडवर जास्त घालवतात. सुट्टीच्या दिवशी असं जास्त प्रमाणात होतं. लहान मुलंही बेडवर बसूनच खेळतात, झोपतात, जेवण करतात. सामान्यपणे सगळ्यांना सवय असते की, गादीवर झोपण्याआधी किंवा बसण्याआधी चादर झटकतात आणि उशी झटकतात, नंतर त्यांचा वापर करतात. पण असं कितीही केलं तरी त्यांवरील न दिसणारे कोट्यावधी बॅक्टेरिया-फंगस तसेच राहतात.

बॅक्टेरियाचं भांडार बेडशीट-उशी

रिसर्चमधून समोर आलंय की, रिसर्चदरम्यान काही लोकांनी नवीन बेडशीट आणि उश्या ४ आठवडे वापरल्या. जेव्हा ४ आठवड्यांनंतर या बेडशीट आणि उश्यांना मायक्रोस्कोपखाली बघण्यात आलं तेव्हा सगळ्यांना धक्का बसला. एक महिने जुन्या बेडशीटमध्ये साधारण १ कोटींपेक्षा जास्त बॅक्टेरिया आढळले. बॅक्टेरियांची ही संख्या तुमच्या टूथब्रश स्टॅंडमध्ये असलेल्या बॅक्टेरियाच्या संख्येपेक्षा ६ पटीने अधिक आहे. तसेच ३ आठवडे जुन्या बेडशीटमध्ये ९० लाख बॅक्टेरिया, २ आठवडे जुन्या बेडशीटमध्ये ५० लाख आणि १ आठवडे जुन्या बेडशीटमध्ये ४५ लाख बॅक्टेरिया होते.

उशी सगळ्यात घातक

आपण कधी विचारही केला नसेल की, सगळ्यात घाणेरडी आपली उशी असते. कारण आपला चेहरा आणि केस याच उशीवर असतात. यामुळे तेल, घाम आणि डेड स्कीन सगळ्यात जास्त उशीवरच असते. ४ आठवडे जुन्या उशीवर १.२ कोटी बॅक्टेरिया आढळले. त्यासोबतच एक आठवडे जुन्या उशीच्या कव्हरवर ५० लाख बॅक्टेरिया असतात.

बेडशीट आणि उशीचे कव्हर बदलण्याची योग्य वेळ?

डॉक्टरांनी सांगितलं की, आठवड्यातून एकदा तरी आपण आपली बेडशीट आणि उशीचे कव्हर बदलले पाहिजेत. हे गरजेचं नाही की, बेडशीटवर काही सांडलं असेल किंवा त्यातून वास येत असेल. अनेकदा चांगला वास येणाऱ्या बेडशीटमध्येही लाखो बॅक्टेरिया असतात. ज्याद्वारे आपल्याला अनेक गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Dirty bedsheets and pillowcases pose health risks: Cleaning frequency matters.

Web Summary : Infrequent bedsheet and pillowcase changes breed bacteria, posing health risks. Experts recommend weekly washing to prevent infections. Studies reveal millions of bacteria thrive on used bedding, exceeding toothbrush bacteria levels. Prioritize regular cleaning for better health.
टॅग्स :स्वच्छता टिप्सहेल्थ टिप्स