Interesting Facts About Human Eye : डोळे आपल्याला मिळालेलं निसर्गाचं मोठं वरदान आहेत. जर डोळेच नसते किंवा आपल्याला दिसलंच नसतं तर ही रंगबेरंगी दुनियाच आपण बघू शकलो नसतो. डोळे आपला मेंदू आणि शरीर यांच्यातील माहितीचं एक माध्यम आहे. डोळे आपल्याला रंग, आकार, अंतर, गति आणि प्रकाशाच्या तीव्रतेची जाणीव करून देतात. आपण पाहिलं असेलच की, जेव्हा आपण बऱ्याच दूरच्या गोष्टी बघतो, तेव्हा त्या आपल्या आकारापेक्षा फार लहान दिसतात. जर आपल्याला विचारलं की, आपले डोळे किती दूरचं बघू शकतात? तर यावर १ - २ किंवा त्यापेक्षा थोडं जास्त दूरचं...असं उत्तर मिळू शकतं. पण डोळ्यांबाबतच्या गोष्टी आपल्याला हैराण करू शकतात.
किती दूरचं बघू शकतात डोळे?
हेल्थलाईन वेबसाईटच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, डोळ्यांची बघण्याची क्षमता त्यांची संरचना आणि व्हिजन क्वालिटीवर अवलंबून असते. डोळ्यांच्या रेटिनामध्ये कोट्यावधी कोशिका असतात, ज्या प्रकाशाची तीव्रता ओळखतात आणि कोन्स रंगांनाही ओळखतात. एका परफेक्ट व्हिजनद्वारे आपण छोटे बिंदू देखील स्पष्टपणे ओळखू शकता. सपाट आणि क्लीअर भागावर मनुष्य जवळपास ३ मैल म्हणजे साधारण ५ किलोमीटर दूरची एखादी वस्तू जसे की, इमारत किंवा डोंगर सहजपणे बघू शकतात. जर एखाद्या गोष्टीचा आकार मोठा असेल तर ती दूरनही दिसू शकते.
चंद्र - सूर्य कसे दिसतात?
जर आपण आकाशाकडे पाहिलं तर आपले डोळे लाखो किलोमीटर दूर असलेल्या गोष्टी जसे की, चंद्र आणि सूर्यही बघू शकतात. कारण खगोलीय वस्तू इतक्या मोठ्या आहेत की, त्यांची प्रतिमा आपल्या रेटिनावर दिसते. NASA नुसार, चंद्र पृथ्वीपासून साधारण ३.८४ लाख किलोमीटर दूर आहे आणि सूर्य जवळपास १.५ कोटी किलोमीटर दूर आहे. तरीही सुद्धा आपण त्याना स्पष्टपणे बघू शकतो. पण लाखो किलोमीटर दूरून हे ग्रह फार छोटे दिसतात. मुळात त्यांचा आकार फार मोठा असतो. डोळांची सीमा फक्त अंतरावर अवलंबून नाही, तर वस्तुचा आकार, प्रकाश उत्सर्जन आणि त्यांची चमक यावर अवलंबून असते.
दूरच्या वस्तू छोट्या का दिसतात?
दूरच्या वस्तू छोट्या का दिसतात? असा प्रश्न आपल्या मनात पडू शकतो. याचं उत्तर ऑप्टिक्समध्ये लपलेलं आहे. डोळे प्रकाशाची भिन्नता आणि अपवर्तन नियमांनुसार काम करतात. जसजशी एखादी गोष्ट आपल्या डोळ्यांपासून दूर जाते, तिच रेटिनावर बनलेल्या इमेजचा आकार छोटा होत जातो. यामुळेच एखादी इमारत किंवा एखादा डोंगर दूर केल्यावर छोटा दिसतो. सोबतच ब्रम्हांडातील धूळ, जलवाष्प आणि प्रकाशाचं परावर्तन इमेजला थोडं धुरस आणि अस्पष्ट बनवतं. डोळ्यांची लेन्स आणि कॉर्निया दूरच्या वस्तुवर फोकस करण्यासाठी आपला आकार बदलत असतात. या प्रक्रियेला एकॉमोडेशन म्हटलं जातं.
