Lokmat Sakhi >Social Viral > टॉयलेटची दुर्गंधी अन् पिवळे डाग दूर करणारा स्वस्तात मस्त उपाय, तयार करा खास निळं पाणी!

टॉयलेटची दुर्गंधी अन् पिवळे डाग दूर करणारा स्वस्तात मस्त उपाय, तयार करा खास निळं पाणी!

Toilet Cleaning : बरेच लोक अनेकदा स्वच्छता करूनही समस्या काही दूर होत नाही. यासाठी वेगवेगळ्या केमिकल्सवर भरपूर पैसाही खर्च केला जातो. पण काही फायदा मिळत नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 11:28 IST2024-12-14T11:26:47+5:302024-12-14T11:28:08+5:30

Toilet Cleaning : बरेच लोक अनेकदा स्वच्छता करूनही समस्या काही दूर होत नाही. यासाठी वेगवेगळ्या केमिकल्सवर भरपूर पैसाही खर्च केला जातो. पण काही फायदा मिळत नाही. 

Home remedies to remove yellow stain and odor smell from toilet | टॉयलेटची दुर्गंधी अन् पिवळे डाग दूर करणारा स्वस्तात मस्त उपाय, तयार करा खास निळं पाणी!

टॉयलेटची दुर्गंधी अन् पिवळे डाग दूर करणारा स्वस्तात मस्त उपाय, तयार करा खास निळं पाणी!

Toilet Cleaning :  लोक घर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी बरीच मेहनत घेत असतात. बाहेरून त्यांचं घर फारच शानदार दिसत असतं. पण, टॉयलेटमध्ये लागलेले पिवळे डाग आणि दुर्गंधी येत असल्याने सगळ्या मेहनतीवर पाणी फेरलं जातं. बरेच लोक अनेकदा स्वच्छता करूनही समस्या काही दूर होत नाही. यासाठी वेगवेगळ्या केमिकल्सवर भरपूर पैसाही खर्च केला जातो. पण काही फायदा मिळत नाही. 

महागड्या केमिकल्सचा वापर करण्याऐवजी आम्ही तुम्हाला स्वस्तात मस्त एक उपाय सांगणार आहोत. ज्याद्वारे टॉयलेटमधील पिवळे डाग दूर होतील आणि दुर्गंधी दूर होईल. सोशल मीडियावर यासंबंधी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक खास मिश्रण तयार करण्याच्या टिप्स सांगितल्या आहेत.

कसं तयार कराल मिश्रण?

होम क्लीनर तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात एक कप फ्लोर फ्रेशनरसोबत बेकिंग सोडा आणि लिक्विड डिटर्जेंट मिक्स करा. नंतर यात एक कप व्हिनेगर टाकून चांगलं मिक्स करा. आता फेस असलेलं निळं लिक्विड तयार होण्यासाठी यात थोडं पाणी टाका. क्लीनर वापरण्यासाठी तयार आहे.


टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी ब्रशच्या मदतीने कमोडमध्ये लिक्विड पसरवा. काही वेळ ते तसंच राहू द्या आणि नंतर फ्लश करा. त्यानंतर ब्रशने कमोड घासून काढा. हीच प्रोसेस तुम्ही टॉयलेटमधील टाईल्स आणि बेसिन स्वच्छ करण्यासाठी करू शकता. 

Web Title: Home remedies to remove yellow stain and odor smell from toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.