Join us

फरशी मळकट, काळी दिसते? लादी पुसण्याच्या पाण्यात १ चमचा हा पदार्थ घाला, चमकेल फरशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 16:07 IST

Home Remedies For Floor Cleaning : हे उपाय फक्त स्वस्त नसतात केमिकल फ्रीसुद्धा असतात. ज्यामुळे घराचं वातावरण हेल्दी आणि सुगंधित राहतं

महागडे फ्लोअर क्लिनर्स आणि केमिकल्समध्ये पैसे वाया घालवण्यापेक्षा तुम्ही किचनमध्ये ठेवलेल्या काही साध्या वस्तूंचा वापर फरशी चमकवण्यासाठी केला तर घर चकचकीत होऊ शकतो. हे उपाय फक्त स्वस्त नसतात केमिकल फ्रीसुद्धा असतात. ज्यामुळे घराचं वातावरण हेल्दी आणि सुगंधित राहतं. (Home Remedies For Floor Cleaning)

फरशी हा आपल्या घरातील सगळ्यात जास्त वापरला जाणारा भाग आहे. ज्यावर रोज धूळ, माती, घाणं, तेलाचे डाग आणि बॅक्टेरिया जमा होतात. लोक मार्केटमध्ये मिळणाऱ्या फ्लोअर क्लिनर्सचा वापर करतात पण यातील केमिकल्स फक्त महाग नसतात तर फरशीचा रंग आणि पॉलिशलासुद्धा नुकसान पोहोचवतात.

पोट-मांड्या जाड्या, कंबरेचा शेपच बिघडलाय? उपाशीपोटी 'ही' पानं चावून खा, झरझर घटेल वजन

जर तुम्हाला फरशीवरील बॅक्टेरियाज नष्ट करायचे असतील तर एक बादली गरम पाण्यात १ कप व्हाईट व्हिनेगर घाला. व्यवस्थित पाण्यात मिसळून लादी पुसून घ्या. व्हिनेगरमुळे बॅक्टेरियाज सहज मरतात आणि गरम पाण्यामुळे बॅक्टेरियाज जास्तवेळ जीवंत राहू शकत नाहीत.

किचन किंवा डायनिंग एरीयामधिल फरशीवर तेल किंवा चिकट डाग जमा होतात. हे काढून टाकण्यासाठी १ वाटी लिंबाचा रस घ्या त्यात २ चमचे बेकींग सोडा मिसळा हे मिश्रण डाग असलेल्या ठिकाणी लावून १० ते १५ मिनिटं तसंच सोडून द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्यात कापड बुडवून लादी पुसा ज्यामुळे लादी स्वच्छ दिसेल.

भरपूर व्हिटामीन B-12 हवं तर रोज खा ‘या’ डाळीचं वरण, हाडंही होतील मजबूत आणि नजरही चांगली

लिंबाचा  रस आणि बेकींग सोडा मिसळून लादी पुसल्यास घाण कायमची निघून जाईल. फरशीवर डाग असतील तर एक बादली पाण्यात २ चमचे मीठ आणि १ चमचा डिटर्जेंट पावडर घालून मिक्स केल्यास फरशीवरचे डाग निघून जातील. याशिवाय चकचकीतपणा येईल.

कडुलिंबाची पानं आणि तुरटी दोन्ही नैसर्गिक किटाणूनाशक आहेत. पाण्यात घालून व्यवस्थित उकळवून घ्या. थंड झाल्यानंतर हे पाणी घालून फरशी स्वच्छ करा. या उपायामुळे फरशीवरचा चिकटपणा, वास आणि बॅक्टेरिया निघून जातील. हा खास उपाय पावसाळ्याच्या दिवसांत केल्यास चांगला परिणाम दिसून येईल. याशिवाय तुम्ही लादी पुसण्याच्या पाण्यात एंटीसेप्टीक लिक्विड जसं की डेटॉल, सॅव्हलॉन  याचे २ ते ३ थेंब घालू शकता.

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्स