Join us  

कढई काळपट दिसते-गंज लागला? शेफ पंकज सांगतात १ खास युक्ती, चांदीसारखी चमकतील भांडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 2:54 PM

Home Hacks : लोखंडाची कढई साफ करतान माईल्ड डिटर्जेंटचा वापर करा.

किचनमध्ये काम करणं म्हणजे एकाद्या मोठ्या टास्कपेक्षा कमी नसते. लोखडांचा तवा, कढई काळे झाल्यानंतर ते साफ करणं खूपच कठीण वाटतं. कढईला लागलेला गंज साफ करण्यात तासनतास निघून जातात. (Home Tips & Hacks)  खूप मेहनत केल्यानंतरही  कढई स्वच्छ होत नाही. काही सोपे उपाय करून तुम्ही कढईचा काळेपणा दूर करू शकता. (How To Prevent Iron Kadai)

तुम्हालाही अशीच समस्या येत असेल तर मास्टर शेफ पकंज भदौरिया यांनी सुचवलले्या टिप्स वापरून तुमचं काम अधिकच सोपं होईल. कढईतील काळेपणा  काढून टाकण्यासाठी काही सोपे  सांगितले आहेत ज्यामुळे गंज निघून जाईल. (Master Chef Pankaj Bhadouria Hacks To Prevent Iron Kadai)

1) सगळ्यात आधी लोखंडाची कढई धुवून स्वच्छ करा

लोखंडाची  कढई किंवा कोणत्याही भांड्याला गंज लागू नये यासाठी सगळ्यात आधी ते धुवून स्वच्च करा. नंतर धुतलेली  कढई किंव  लोखंडांचे भांडे सुती कापडाने व्यवस्थित पुसून ह्या. ही भांडीत पाण्यात जास्तवेळ राहणार नाही याची काळजी घ्या. 

2) मोहोरीचे तेल

लोखंडाच्या कढईत किंवा कोणतंही भांडं धुवू सुकवून त्यात मोहोरीचे तेल घाला. त्यानंतर  भांड्यावर तेल घालून एका बाजूला पसरवून घ्या. जेणेकरून सर्व भागात तेल व्यवस्थित लागेल. अन्यथा लोखंडाच्या भांड्याच्या कोणत्या ना कोणत्या भागावर गंज लागेल.

3) भांडी कापडाने व्यवस्थित पुसून घ्या

लोखंडाच्या कढईला फक्त तेल लावल्याने काम पूर्ण होत नाही, तुम्ही कढई कोणत्याही कापडाने पुसू शकता. त्यानंतर एक सुती कापड घ्या आणि कढई पुसून घ्या.  असं केल्यानं कढई असो किंवा कोणतंही भांड गंज  लागण्याची समस्या उद्भवणार नाही. 

प्रचारसभेत नितीन गडकरींनाही आली भोवळ, उन्हात घराबाहेर जाताना प्या २ गोष्टी, उष्माघाताचा धोका टाळा

4) या गोष्टींची काळजी घ्या

लोखंडाची कढई साफ करतान माईल्ड डिटर्जेंटचा वापर करा. याव्यतिरिक्त तुम्ही धुतल्यानंतर पुसून ठेवू शकता. कढईला हलक्या हाताने तेल लावा जेणेकरून गंज लागणार नाही.  लोखंडाच्या कढई आंबट पदार्थ चुकूनही शिजवू नका.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न