Join us  

Home Hacks Ideas : वॉटर फिल्टर, माठाच्या नळातून सतत पाणी गळतं? ५ ट्रिक्स, पाणी गळणं कायमचं होईल बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 4:42 PM

Home Hacks Ideas : कोणतेही फिल्टर ठीक करण्यासाठी, प्रथम त्या नळातून पाणी का गळत आहे ते तपासा. साधारणपणे, फिल्टरमधून पाणी गळण्याची दोन कारणे असू शकतात. टॅप तुटलेला असू शकतो किंवा फिल्टर टॅपचा जॉईन्ट सैल झालेला असू शकतो. 

स्वयंपाकघरातील वॉटर फिल्टर, माठातून थेंब थेंब पाणी गळतंय असं अनेकदा दिसून येतं. दुर्लक्ष केल्यानं किंवा पाणी गळती थांबवण्यासाठी नेमकं काय करावं हे सुचत नसल्यानं प्रोब्लेम तसाच राहतो. दिवसभर फिल्टरमधून पाणी टपकत राहते. काही वेळा फिल्टरचा नळही बंद होतो. (How to fix water leaking from filter spout) तुमच्यासोबतही असेच काही घडले तर आता तुम्हाला प्लंबरला बोलवण्याची आणि पैसे घालवण्याची काही गरज नाही. (Home Hacks and Tips) या लेखात तुम्हाला काही टिप्स आणि हॅक्स सांगणार आहोत. ज्याचे पालन करून फिल्टरमधून पाणी टपकण्याची समस्या दूर केली जाऊ शकते. (How do I stop my water filter from leaking)

१) सगळ्यात आधी हे काम करा

कोणतेही फिल्टर ठीक करण्यासाठी, प्रथम त्या नळातून पाणी का गळत आहे ते तपासा. साधारणपणे, फिल्टरमधून पाणी गळण्याची दोन कारणे असू शकतात. टॅप तुटलेला असू शकतो किंवा फिल्टर टॅपचा जॉईन्ट सैल झालेला असू शकतो. फिल्टर टॅप तुटल्यास, तुम्हाला तो बदलावा लागेल. जर ते गळत असेल तर आपण ते सहजपणे दुरुस्त करू शकता.

काळे पडलेले स्विच बोर्ड २ मिनिटात होतील स्वच्छ; फक्त ३ उपाय करा, घर नेहमी दिसेल चकाचक

२) वॉटर प्रुफ टेपचा वापर

जर फिल्टर जॉइंटमधून पाणी गळत असेल, तर तुम्ही वॉटरप्रूफ टेपचा वापर करून ते सहजपणे दुरुस्त करू शकता. ही टेप तुम्हाला कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स दुकानात सहज मिळेल. टेप वापरण्यापूर्वी, गळतीची जागा चांगली कोरडी करा आणि त्या भागाला वॉटरप्रूफ टेपने चांगले झाकून गुंडाळा. यानंतर  टॅप पुन्हा घट्ट करा.

भारतीय महिला होतात पुरुषांपेक्षा 'लवकर' सेक्शुअली ऍक्टिव्ह; Sex Life चं गुपीत सांगणारा रिसर्च समोर

३) जॉईन्टवर लिकेज असल्यास हा उपाय करा

कोणत्याही जॉइंटमधून पाणी गळत असल्याचे अनेकदा दिसून येते. स्वयंपाकघराचा नळ असो किंवा फिल्टर असो, या दोन्ही ठिकाणांहून पाणी गळती सुरू होते. अशा स्थितीत, जर जॉईन्ट्समधून पाणी गळत असेल तर आपण ते ठीक करण्यासाठी धागा वापरू शकता. यासाठी प्रथम फिल्टरमधील नळ काढून घ्या आणि काही वेळ सूर्यप्रकाशात ठेवा. आता नळाला धागा चांगला गुंडाळा आणि फिल्टरमध्ये ठेवून पुन्हा घट्ट करा.

४) कव्हरचा वापर करा

जर फिल्टरमधून खूप पाणी गळत असेल तर तुम्ही ही समस्या टाळण्यासाठी नळाचे कव्हर वापरू शकता. याचा वापर फिल्टरमधून टपकणारे पाणी थांबवण्यासाठी केला जातो. जर ते आधीपासून फिल्टरसोबत मिळालं नसेल तर तुम्ही ते बाजारातून देखील खरेदी करू शकता. ५० रूपयांच्या आत सहज उपलब्ध होईल.

टॅग्स :किचन टिप्ससुंदर गृहनियोजन