Lokmat Sakhi >Social Viral > फक्त १० रुपयांचा सोपा उपाय- फर्निचरला वाळवी लागणार नाही, वर्षांनुवर्षे नव्यासारखं राहील

फक्त १० रुपयांचा सोपा उपाय- फर्निचरला वाळवी लागणार नाही, वर्षांनुवर्षे नव्यासारखं राहील

Home Hacks for Termites: फर्निचरला वाळवी लागू नये म्हणून हे काही उपाय तुम्ही नक्कीच घरच्याघरी करू शकता.(how to get rid of termites?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2025 14:03 IST2025-08-27T14:02:40+5:302025-08-27T14:03:28+5:30

Home Hacks for Termites: फर्निचरला वाळवी लागू नये म्हणून हे काही उपाय तुम्ही नक्कीच घरच्याघरी करू शकता.(how to get rid of termites?)

home hacks for Termites, how to get rid of termites, how to protect furniture from termites  | फक्त १० रुपयांचा सोपा उपाय- फर्निचरला वाळवी लागणार नाही, वर्षांनुवर्षे नव्यासारखं राहील

फक्त १० रुपयांचा सोपा उपाय- फर्निचरला वाळवी लागणार नाही, वर्षांनुवर्षे नव्यासारखं राहील

Highlightsआठवड्यातून एकदा पुढे सांगितलेल्या काही पद्धतींनी फर्निचर स्वच्छ करून पाहा..

पावसाळ्याच्या दिवसांत फर्निचरची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसांत सगळीकडेच ओलसर, दमट वातावरण असल्याने त्याचा परिणाम घरातल्या फर्निचरवरही होतो. बहुतांश ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घराच्या भिंतींनाही ओल येते. जर तुमचं फर्निचर फिक्स आणि घराच्या भिंतींना ॲटॅच्ड असेल तर भिंतींची ओल फर्निचरला लागून ते खराब होण्याची, त्याला वाळवी लागण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसांत फर्निचरची थोडी जास्त काळजी घ्यायला हवी. त्यासाठी आठवड्यातून एकदा पुढे सांगितलेल्या काही पद्धतींनी फर्निचर स्वच्छ करून पाहा (how to get rid of termites?). फर्निचरला वाळवी लागून ते खराब होणार नाही.(how to protect furniture from termites?)

 

फर्निचरला वाळवी लागू नये यासाठी घरगुती उपाय

१. फर्निचरचं वाळवीपासून संरक्षण होण्यासाठी नीम ऑईल खूप उपयुक्त ठरतं. कारण त्याचा उग्र वास आणि कडवटपणा वाळवीसाठी त्रासदायक ठरतो. यासाठी नीम ऑईल आणि पाणी सम प्रमाणात एकत्र करा.

चहाचं पाणी 'या' पद्धतीने केसांना लावा! न्हाऊन होताच केसांच्या समस्या कमी झालेल्या दिसतील..

आता या मिश्रणाने घरातलं सगळं फर्निचर पुसून घ्या. ज्या ठिकाणी फर्निचर भिंतीला ॲटॅच्ड आहे तिथे जरा जास्त नीम ऑईल शिंपडा.

 

२. मीठ आणि पाणी यांचं मिश्रण वापरूनही फर्निचरला लागलेली वाळवी कमी करता येते. हा उपाय करण्यासाठी मीठ आणि पाणी सम प्रमाणात एकत्र करा.

वजन, शुगर वाढेल म्हणून मोदक खावा की नाही असं वाटतंय? ऋजुता दिवेकर देतात खास टिप्स...

पाण्यामध्ये जेव्हा मीठ पुर्णपणे विरघळेल तेव्हा हे पाणी वाळवी लागलेल्या फर्निचरवर शिंपडा. मीठामुळे वाळवी डिहायड्रेटेड होऊन कोरडी पडू लागते आणि हळूहळू कमी होते. 

 

३. बोरेक्स पावडरदेखील वाळवीचा नाश करण्यासाठी उपयुक्त ठरते. यासाठी ज्या ठिकाणी वाळवी लागलेली आहे, त्याठिकाणी नियमितपणे बोरेक्स पावडर शिंपडा.

ऐन सणासुदीला चेहऱ्यावर पिंपल्स नकोच! ५ ब्यूटी टिप्स- त्वचा राहील नितळ, सुंदर, ग्लोईंग

हळूहळू वाळवी कमी होऊन जाईल. फर्निचरला वाळवी लागू नये म्हणूनही पुर्वकाळजी म्हणून तुम्ही हा उपाय महिन्यातून एकदा करू शकता. 

 

Web Title: home hacks for Termites, how to get rid of termites, how to protect furniture from termites 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.