Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > घर चमकेल पण श्वास गुदमरेल! फिनाईल- स्प्रेमध्ये लपलंय 'स्लो पॉयझन', घरगुती उपायांनी चकाचक करा फरशी- बाथरुम

घर चमकेल पण श्वास गुदमरेल! फिनाईल- स्प्रेमध्ये लपलंय 'स्लो पॉयझन', घरगुती उपायांनी चकाचक करा फरशी- बाथरुम

Floor cleaner side effects: Chemical cleaners health risks: Natural floor cleaning methods: आपण काही सोपे घरगुती उपाय केल्यास घराची स्वच्छता तर होईलच पण आरोग्याची काळजी देखील घेता येईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2026 14:15 IST2026-02-09T14:13:48+5:302026-02-09T14:15:25+5:30

Floor cleaner side effects: Chemical cleaners health risks: Natural floor cleaning methods: आपण काही सोपे घरगुती उपाय केल्यास घराची स्वच्छता तर होईलच पण आरोग्याची काळजी देखील घेता येईल.

home floor cleaning hacks harmful effects of phenyl and spray cleaners at home natural home remedies to clean floors and bathrooms how chemical floor cleaners affect breathing and lungs | घर चमकेल पण श्वास गुदमरेल! फिनाईल- स्प्रेमध्ये लपलंय 'स्लो पॉयझन', घरगुती उपायांनी चकाचक करा फरशी- बाथरुम

घर चमकेल पण श्वास गुदमरेल! फिनाईल- स्प्रेमध्ये लपलंय 'स्लो पॉयझन', घरगुती उपायांनी चकाचक करा फरशी- बाथरुम

सकाळच्या वेळी घर साफ करणं म्हणजे प्रत्येक महिलेसाठी वेगळा टास्कच. घर आवरणं, मुलांचा डबा, जेवण बनवणं, घर सांभाळणं आणि कामाला जाणं या सगळ्यात घराची स्वच्छता राखणं हे मोठे आव्हान असते.(Floor cleaner side effects) घर चकाचक दिसावं आणि पाहुण्यांनी कौतुक करावं यासाठी आपण बाजारातील महागडे, फिनाईल, टॉयलेट क्लीनर्स आणि काच साफ करणारे स्प्रे सर्रास वापरतो.(Chemical cleaners health risks) पण लवकर घर स्वच्छ करण्याच्या नादात आपण आपल्या फुफ्फुसांशी खेळत आहोत, याची आपल्याला कल्पना देखील नसते. (Home remedies for floor cleaning)
घराची साफसफाई केल्याने आपल्याला फ्रेश वाटते. पण कधी विचार केला आहे का? क्लिनिंग उत्पादनांचा दीर्घकाळ वापर फुफ्फुसांवर हानिकारक परिणाम होतो. अनेक स्वच्छता उत्पादनांमध्ये अशी रसायने असतात जी हवेत सहज विरघळतात आणि श्वासांद्वारे आपल्या आत जातात.(Bathroom cleaning without chemicals) वारंवार हे क्लीनर्स वापरल्याने आपल्या श्वसनाचे त्रास, ऍलर्जी, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. यातील हानिकारक घटक आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात. अशावेळी आपण काही सोपे घरगुती उपाय केल्यास घराची स्वच्छता तर होईलच पण आरोग्याची काळजी देखील घेता येईल. 

वाटीभर सायीचे होईल रवाळ सुगंधी तूप, पाहा भन्नाट ट्रिक - तूप खाऊन येईल रूप

घराची साफसफाई करण्यासाठी केमिकल्स उत्पादने वापरण्याऐवजी काही घरगुती उपाय करुन बघा. बाथरुमचे पिवळट डाग काढण्यासाठी आपल्याला बेकिंग सोड्यावर लिंबाचा रस घालून १० मिनिटे ठेवा. अगदी नव्यासारखे बाथरुम चमकेल. काचेच्या खिडक्या किंवा आरसे स्वच्छ करण्यासाठी पाण्यात थोडे व्हिनेगर मिसळून स्प्रे करा. डाग निघून जाण्यास मदत होईल. फरशी पुसण्यासाठी पाण्यात मीठ टाकून पुसल्याने घरात माश्या आणि कीटके दूर राहतात. 

बाथरूमच्या टाईल्स किंवा कोपऱ्यात साचलेला पिवळटपणा काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचे मिश्रण रामबाण उपाय आहे. डाग असलेल्या ठिकाणी बेकिंग सोडा शिंपडा, त्यावर थोडे पांढरे व्हिनेगर टाका. फेस येईल, तो १०-१५ मिनिटे तसाच राहू द्या आणि नंतर ब्रशने घासा. 

एका बादली पाण्यात अर्धा कप व्हिनेगर, २ चमचे खडे मीठ आणि ५-६ थेंब लिंबू किंवा लॅव्हेंडर ऑईल घाला. यामुळे फरशी चकाक होण्यास मदत होईल. तसेच तेलामुळे घर सुगंधीत राहते. 

Web Title : साफ घर, बीमार फेफड़े: रसायन छोड़ें, प्राकृतिक सफाई अपनाएं!

Web Summary : रासायनिक क्लीनर फेफड़ों के लिए हानिकारक हैं। बाथरूम के लिए बेकिंग सोडा और नींबू, कांच के लिए सिरका और फर्श के लिए नमक का पानी इस्तेमाल करें। सिरका, नमक और तेल से घर स्वस्थ और सुगंधित रहता है।

Web Title : Clean Home, Sick Lungs: Ditch Chemicals, Embrace Natural Cleaning!

Web Summary : Chemical cleaners, though effective, harm lungs. Use baking soda and lemon for bathrooms, vinegar for glass, and salt water for floors. Vinegar, salt, and essential oils create a sparkling, fragrant, and healthy home.