Home care tips in monsoon : पावसाच्या दिवसांमध्ये घराच्या भिंतीमध्ये ओल येण्याची, पोपडे पडण्याची समस्या भरपूर वाढते. ज्यामुळे भिंतींवर बुरशीही लागते. अशात भिंतींचं मोठं नुकसान होतं. त्यामुळे पावसाळ्यात ओल येण्याची समस्या दूर करण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो केल्या जाऊ शकतात. पावसाचे दिवस जेवढे आनंद देणारे असतात, तेवढेच समस्या वाढवणारे देखील असतात. पावसाला सुरूवात होताच, घराच्या भिंतीवर ओल येऊ लागते आणि वासही येऊ लागतो. ओल आल्यावर भिंतीचे पोपडे पडू लागतात. ज्यामुळे त्यांवर लावलेला महागडा पेंटही निघून जातो. चला तर पाहुया काही सोपे उपाय...
ओल आल्यामुळे घराचं सौंदर्य बिघडतं असं नाही तर आरोग्यासाठीही नुकसानकारक ठरतं. काही लोकांना यामुळे दमा आणि स्किन अॅलर्जी होऊ शकते. मात्र, ओलेची समस्या जेवढी कॉमन आहे, तेवढाच यावरील उपाय सोपा आहे.
घरात दमटपणा जमा झाल्यानं ओलेची समस्या अधिक वाढते, त्यामुळे व्हेंटिलेशन म्हणजे हवा खेळती राहणं खूप गरजेचं असतं. सामान्यपणे आपण पावसाच्या दिवसांमध्ये घराची दारं, खिडक्या बंद ठेवतो. पण अनेकदा हीच सवय ओल येण्याचं कारण ठरते. दिवसातून एकदा दारं-खिडक्या उघडायला हव्या.
मीठ आणि कोळसा
मीठ किंवा कोळशानं हवेतील ओलावा किंवा दमटपणा शोषूण घेतला जातो. अशात आपण जर रूममध्ये एका भांड्यात मीठ ठेवलं किंवा कोळसा ठेवला तर हवेतील ओलावा कमी होऊ शकतो. यानं ओल येण्याचा धोका कमी केला जाऊ शकतो. आठवड्यातून दोनदा हे बदलायचे. जेणेकरून त्यांचा प्रभाव कायम रहावा.
लाकडी फर्निचरचं काय?
पावसाळ्यात लाकडी फर्निचर भिंतींपासून दूर ठेवायलं हवं. फर्निचर भिंतींना लागून ठेवल्यानं भिंतींना हवा लागत नाही. ज्यामुळे त्यावर बुरशी येते. लाकडाडे फर्निचर भिंतींपासून कमीत कमी ५ इंच दूर ठेवा.
त्याशिवाय घरातील काही भिंती अशा असतात ज्यांमध्ये दरवर्षी ओल येते आणि बुरशी लागते. अशा या भिंतींवर सीमेंटयुक्त वॉचरप्रूफ पेंट किंवा कोटिंग करू शकता. यानं ओल येणं बंद होण्यास मदत मिळू शकते. सोबतच छतावर वॉटरप्रफिंग करावं.