Holi Tips : रंग खेळायचा म्हटलं की, रंग आणि पाणी आलंच. रंगपंचमीला (Holi Festival 2025) वेगवेगळे रंग लावून पाण्यात भिजण्याची मजाच काही और असते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना रंग खेळणं आणि पाण्यात भिजणं आवडतं. मात्र, रंग (Rang Panchami) खेळताना अनेक त्वचेला इन्फेक्शन होतं, डोळ्यांना इजा होते. इतकंच नाही तर अनेकांचे फोनही पाण्यात भिजतात. अशात हजारो रूपयांच्या फोन नुकसान होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काय घ्याल काळजी?
- जर फोन पाण्यात पडला किंवा पाण्यानं भिजला असेल तर लगेच स्वीच ऑफ करावा. कारण भिजलेला फोन वापरणं महागात पडू शकतं. कारण फोनमध्ये पाणी गेल्यावर सर्किट्सचं नुकसान होतं आणि स्मार्टफोन नेहमीसाठी खराब होऊ शकतो.
- फोन कापडानं पुसून घ्या आणि टिशू पेपर किंवा एखाद्या कापडामध्ये गुंडाळून ठेवा. जेणेकरून फोनमध्ये गेलेलं पाणी शोषलं जाईल. त्यानंतर लगेच फोनमधून सीम कार्ड आणि मेमरी कार्ड काढून घ्या. फोन व्यवस्थित झटका जेणेकरून त्यातील पाणी बाहेर येईल.
- स्मार्टफोनमध्ये गेलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे तांदूळ. फोन तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा आणि डब्याचं झाकण लावा. या डब्यात फोन २४ तासांसाठी तसाच राहू द्या. तांदळाचे दाणे फोनमध्ये गेलेलं पाणी शोषूण घेतात.
- फोन स्वच्छ करण्यासाठी बॅक पॅनर उघडून उन्हात ठेवा. उन्हातही फोनमध्ये गेलेलं पाणी सुकतं. हे करत असताना याचीही काळजी घ्या की, फोन फार कडक उन्हात जास्तवेळ ठेवू नका. कारण जास्त उन्हामुळं फोनमधील प्लॅस्टिक कॉम्पोनेंट वितळू शकतात.
- त्यानंतर फोन ऑन करा आणि त्यातील डेटाचा बॅकअप घ्या. शक्यता आहे की, फोनमधील काही पार्ट्समध्ये काही समस्या असेल. किंवा नंतर त्यात काही बिघाड होऊन तुमचा डेटा जाऊ शकतो.
काय टाळावं?
१) जर तुमचा फोन पाण्यात भिजला असेल आणि वॉरंटी पिरियडमध्ये असेल तर कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस स्टेशनमध्ये घेऊन जा. पण फोन पाण्यात पडला होता हे कंपनीपासून लपवू नका. कारण त्यांना फोन उघडून पाहिल्यावर लगेच ही बाब कळेल. असं असेल तर कंपनी तुम्हाला वॉरंटी देणार नाही.
२) फोनमध्ये पाणी गेलं असेल तर तो हेअरड्रायरनं कोरडा करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. हेअरड्रायरची हवा फार गरम असते आणि यामुळे फोनमधील इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स खराब होऊ शकतात.
३) फोन भिजल्यानंतर चार्जिंगला अजिबात लावू नका. यामुळे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. तसेच फोनमध्ये कोणतीही टोकदार वस्तू टाकण्याचा प्रयत्न करू नका. असं केल्याने पाणी फोनमध्ये आणखी आत जाण्याची शक्यता असते.