Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > Video - "बाळ पडलंय...!" गटार साफ करण्यासाठी बाईने केला 'खतरनाक' प्लॅन; प्रशासन हादरलं पण..

Video - "बाळ पडलंय...!" गटार साफ करण्यासाठी बाईने केला 'खतरनाक' प्लॅन; प्रशासन हादरलं पण..

एका महिलेने तुंबलेला नाला स्वच्छ करून घेण्यासाठी 'खतरनाक' प्लॅन केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 18:07 IST2026-02-03T18:06:56+5:302026-02-03T18:07:31+5:30

एका महिलेने तुंबलेला नाला स्वच्छ करून घेण्यासाठी 'खतरनाक' प्लॅन केला.

‘Help, Someone’s In Drain!’ Meerut Hoax Triggers Heavy Machinery Mayhem — Zero Victim, Epic Before-After Glow-Up | Video - "बाळ पडलंय...!" गटार साफ करण्यासाठी बाईने केला 'खतरनाक' प्लॅन; प्रशासन हादरलं पण..

Video - "बाळ पडलंय...!" गटार साफ करण्यासाठी बाईने केला 'खतरनाक' प्लॅन; प्रशासन हादरलं पण..

उत्तर प्रदेशातील मेरठमधील एका व्हिडिओमुळे सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. एका महिलेने तुंबलेला नाला स्वच्छ करून घेण्यासाठी 'खतरनाक' प्लॅन केला. या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रिपोर्टनुसार, या महिलेने "माझं बाळ नाल्यात पडलं आहे" असा दावा करत प्रशासनाला मदतीसाठी बोलावलं. या इमर्जन्सी कॉलमुळे पोलीस आणि महानगरपालिकेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केलं.

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तब्बल तीन तास या ठिकाणी शोधमोहीम राबवली. या दरम्यान नाल्यात साचलेला कचरा आणि चिखल उपसून काढण्यात आला. मात्र तपासाअंती असं लक्षात आलं की तिथे कोणी बाळ पडलं नव्हतं. ही धक्कादायक घटना एखादी दुर्घटना नसून गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महिलेने केलेला एक केविलवाणा प्रयत्न होता.

खोट्या अफवेमुळे प्रशासनावर टीका होत असली, तरी यामुळे वर्षानुवर्षे तुंबलेला नाला अखेर पूर्णपणे स्वच्छ झाला. स्थानिक रहिवाशांच्या मते, अनेकवेळा तक्रारी करूनही जे काम झाले नव्हतं, ते या एका नाट्यामुळे पूर्ण झालं. इंटरनेटवर या घटनेबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

काही युजर्सनी महिलेची ही युक्ती 'स्मार्ट' असल्याचं म्हटलं असून हे जनतेच्या हतबलतेचं लक्षण असल्याचं सांगितलं. तर काहींनी अशा पद्धतीचे धोकेही बोलून दाखवले. एका युजरने कमेंट केली की, "जेव्हा मूलभूत नागरी कामांसाठी नागरिकांना अशा प्रकारे खोट्या इमर्जन्सीचा बनाव रचावा लागतो, तेव्हा ती गोष्ट हास्यास्पद आणि चिंतेचीही असते. जर प्रशासनाने नाट्याशिवाय काम केले असतं तर किती बरे झाले असते."

काही लोकांनी 'लांडगा आला रे' या गोष्टीचा संदर्भ देत भविष्यातील धोक्यांकडे लक्ष वेधलं. "आज खोट्या कारणामुळे काम झालं असले तरी, भविष्यात जेव्हा खरोखरच एखादी इमर्जन्सी येईल, तेव्हा प्रशासन याला गांभीर्याने घेणार नाही" अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच "महानगरपालिकेकडे जर साधनं उपलब्ध आहेत, तर त्यांनी तक्रारीची वाट न पाहता शहर स्वच्छ का ठेवलं नाही?" असा सवालही विचारला जात आहे. या घटनेमुळे सरकारी कारभार आणि नागरी जबाबदारीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Web Title : महिला के झूठे कॉल से नाला हुआ साफ़, प्रशासन हरकत में!

Web Summary : मेरठ में एक महिला ने नाले में बच्चे के गिरने का झूठा दावा किया, जिससे प्रशासन हरकत में आया और सालों से उपेक्षित नाले की सफाई हो गई। इस घटना पर मिली-जुली प्रतिक्रियाएं आईं, जो नागरिक उदासीनता और बुनियादी सेवाओं के लिए बेताब उपायों को उजागर करती हैं।

Web Title : Woman's fake 'baby in drain' call gets drain cleaned.

Web Summary : In Meerut, a woman falsely claimed her baby fell into a drain, prompting authorities to clean it after years of neglect. This drastic measure sparked mixed reactions, highlighting civic apathy and desperate measures for basic services.