Join us

भर पावसात रडणाऱ्या मुलीला आईनं पाठीवर उचललं;  मायलेकींमधलं प्रेम पाहून लोक म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 16:09 IST

Heartwarming video of mother carrying daughter : मुलांच्या प्रेमापोटी काहीही करण्याची आईची तयारी असते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हाला आनंद होईल

जगात आईच्या प्रेमापेक्षा मोठं काहीच नसतं. परिस्थिती कशीही असली तरी आपल्या मुलांना नेहमीच उत्तम गोष्टी मिळाव्या असं आई वडिलांना वाटतं. मुलांच्या प्रेमापोटी काहीही करण्याची आईची तयारी असते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हाला आनंद होईल. (Heartwarming video of mother carrying daughter on her shoulders in the rain goes viral internet loves it)

भर पावसात एका महिलेने आपल्या मुलीला खांद्यावर घेऊन जातानाचा एक अतिशय हृदयस्पर्शी व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. जिंदगी गुलजार है...नावाच्या पेजने ती पोस्ट शेअर केली होते आणि या व्हिडिओला ३७ हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 18 सेकंदाच्या क्लिपमध्ये पाऊस पडत असताना एक महिला आपल्या मुलीला खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे. 

 बॅड कोलेस्टेरॉल वाढणारच नाही; फक्त रोजचा स्वयंपाक 'या' तेलात करा, तब्येत राहील उत्तम

तिची मुलगी पावसात भिजू नये म्हणून तिने एका हातात छत्रीही घेतली होती. आई आई असते असे कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे. नेटिझन्सना व्हिडिओ खूप आवडला. कमेंट्स विभागात वेगवेगळ्या प्रतिक्रियासुद्धा दिल्या जात आहेत. हा व्हिडिओ हृदयस्पर्शी असल्याची कमेंटही एका युजरनं केली आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया