सेक्सिस्ट टिपण्णी ऐकायला कोणालाच आवडत नाही. फक्त महिलांनाच अशा टिपण्ण्या ऐकाव्या लागतात असे नाही. पुरुषांनाही ऐकाव्या लागतात. ( He said, "stay in the kitchen" and she burned him, read why she got angry )मात्र महिलांना जरा जास्त ऐकवल्या जातात. आजकाल महिला फक्त चूल आणि मूल एवढेच आयुष्य जगत नाहीत. त्या इतरही क्षेत्रांमध्ये सहभाग घेतात. सेक्सिस्ट टिपण्णी म्हणजे जेव्हा एखाद्याला त्याच्या लिंगावरुन कामाची वाटणी केली जाते. किंवा त्यानुसार ऐकवले जाते. जसे की महिलांनी ओट्यापाशी राहावे असे अनेक जण म्हणतात. ही टिप्पणी सेक्सिस्ट आहे. अशीच एक टिपण्णी करणाऱ्या मित्राला त्याच्या वाक्यांची फार मोठी किंमत मोजावी लागली.
एबीसी न्यूजवरील मजकूरानुसार, ऑस्ट्रेलियात राहणार्या २४ वर्षीय कॉर्बी जेन या महिलेने तिच्या घरी हाऊस पार्टीचे आयोजन केले होते. तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना तिने पार्टीसाठी बोलवले होते. आता वेस्टर्न मध्ये पार्टी होणार म्हणजे तिकडे अल्कोहोल आणि इतर मादक पदार्थ असतातच. ( He said, "stay in the kitchen" and she burned him, read why she got angry )सगळे मिळून व्यसनांवर व्यसने करत असताना कॉर्बीला व्यसन झेपत नाही असे म्हणत सगळे तिची मजा घ्यायला लागले. कोर्टात कॉर्बीच्या मित्रांनी सांगितल्यानुसार, कॉर्बी आणि तिचा एक मित्र जेक लोडर त्या दोघांमध्ये जरा वाद सुरू होता. बोलताना जेकने कॉर्बीला सांगितले," तुला पुरुषांसोबत बसायला जमत नाही तर तू गपचूप किचनमध्ये जा आणि जेवण बनव." या वाक्यानंतर कॉर्बी प्रचंड चिडली आणि गॅरेजमध्ये जाऊन गॅसोलिन घेऊन आली. ते गॅसोलिन तिने जेकवर ओतले आणि त्याला पेटवण्याची धमकी दिली. तरी जेक ती काही करणार नाही या आविर्भावात हा पेटवून दाखव' असे म्हणत कॉर्बीला आणखी उकसवले. दारुच्या धुंदीत असलेल्या कॉर्बीने काहीही विचार न करता लाइटर पेटवून जेकच्या शरीराला आग लावली.
जेकच्या शरीराचा ५५% भाग भाजून निघाला. त्याला दहा सर्जरी कराव्या लागल्या तसेच त्याला कोमातून बाहेर यायला आठ दिवस लागले. कोर्टात केस चालू असताना कॉर्बीने सगळा प्रकार स्वीकारला आणि माफीही मागितली. माझ्या एका चुकीमुळे जेकला आणि त्याच्या कुटुंबियांना मोठ्या संकटातून जावे लागते आहे याची मला आयुष्यभर खंत राहील असेही ती म्हणाली. सोशल मिडियावर मात्र या बातमीमुळे चर्चेला चालना मिळाली आणि जगभरातून लोकांनी त्यांची मते मांडायला सुरवात केली. काही म्हणतात मुलाची चूक आहे तर, काही म्हणतात मुलीची.