Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > एका लग्नाची दुसरी गोष्ट! त्यानं लग्नखर्च करण्यासाठी शोधले स्पॉन्सर, कोटवर लावले लोगो आणि..

एका लग्नाची दुसरी गोष्ट! त्यानं लग्नखर्च करण्यासाठी शोधले स्पॉन्सर, कोटवर लावले लोगो आणि..

He found sponsors to pay for the wedding, put the logo on the coat, groom got viral after his creative idea : लग्नासाठी खर्च करण्यापेक्षा नवऱ्याला सुचली भन्नाट आयडिया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2025 13:49 IST2025-10-31T13:46:32+5:302025-10-31T13:49:13+5:30

He found sponsors to pay for the wedding, put the logo on the coat, groom got viral after his creative idea : लग्नासाठी खर्च करण्यापेक्षा नवऱ्याला सुचली भन्नाट आयडिया.

He found sponsors to pay for the wedding, put the logo on the coat, groom got viral after his creative idea | एका लग्नाची दुसरी गोष्ट! त्यानं लग्नखर्च करण्यासाठी शोधले स्पॉन्सर, कोटवर लावले लोगो आणि..

एका लग्नाची दुसरी गोष्ट! त्यानं लग्नखर्च करण्यासाठी शोधले स्पॉन्सर, कोटवर लावले लोगो आणि..

लग्न म्हटलं की खर्च, तयारी, आणि मोठा सोहळा असतोच. आम्ही लग्न साधेच करु म्हटले तरी खर्च काही वाचत नाही. मग भारत असो वा अन्य इतर देश, लग्नात खिशाला कात्री लागतेच. भारतात जोडप्याला भेटवस्तू, पैसे देण्याची प्रथा आहे. ( He found sponsors to pay for the wedding, put the logo on the coat, groom got viral after his creative idea)फक्त भारतातच नाही इतरही ठिकाणी जोडप्याला भेट दिलीच जाते. आजकाल लोकं कोणत्याही गोष्टीत संधी शोधतात, पण फ्रान्समधील एका वराने स्वतःच्या लग्नात पैसे वाचवायची वेगळीच संधी साधली. लग्नाचा खर्च व्यवसायाच्या कल्पकतेने भागवण्याचा अनोखा मार्ग शोधला. या माणसाने आपल्या लग्नाला स्टार्टअप स्पॉन्सर्ड इव्हेंटच करुन टाकले .

Dagobert Renouf नावाच्या फ्रेंच उद्योजकाने आपल्या लग्नाच्या सूटवर वेगवेगळ्या कंपन्यांचे लोगो लावले. या जाहिरातींमधून मिळालेल्या रकमेतून त्याने लग्नाचा खर्च भागवला. सोशल मीडियावर त्याची ही कल्पना व्हायरल झाली आहे आणि लोक त्याला बिझनेस माइंडेड ग्रूम म्हणून त्याचे हसत-हसत कौतुक करत आहेत.

रेनूफने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही कल्पना काही महिन्यांपूर्वी शेअर केली होती. तो म्हणाला, लोक लग्नासाठी कर्ज घेतात, मी विचार केला आपण काहीतरी वेगळे करुया. लगेचच अनेक स्टार्टअप्स आणि लहान कंपन्यांनी यात भाग घेतला. काहींनी तर ही मार्केटिंगची अफलातून संधी असल्याचं म्हटलं. त्याच्या सूटवर २६ ब्रँड्सचे लोगो होते. अगदी छातीपासून कॉलरपर्यंत! लग्नाच्या दिवशी तो जणू चालतं-बोलतं स्पॉन्सर्ड बिलबोर्ड दिसत होता. त्यामुळे लोकांनी त्याची कल्पकता आणि विनोदबुद्धी दोन्हीची दाद दिली. विविध साईट्सवर असलेल्या माहितीनुसार, त्याचं लग्न खर्चिक न होता प्रसिद्ध झालं आणि लहान-मोठ्या ब्रँड्सना कमी पैशात प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया मात्र जबरदस्त आहेत. कुणी म्हणतंय 'हा माणूस मार्केटिंगचा बादशहा आहे', तर कुणी हसत विचारतंय 'भारतीय वर असं करेल का? शेरवानीवर जाहिरात?' काहींना हे कल्पक वाटलं, तर काहींना थोडं विचित्र. पण एक गोष्ट नक्की, या वराने लग्नाला एक ब्रँडेड इव्हेंट करुन त्याला वेगळेच स्वरुप दिले.  

कदाचित पुढच्या काळात भारतातही असं काही होईल, 'दुलहन्स मेकअप बाय X ब्रँड' किंवा 'मंडप स्पॉन्सर्ड बाय Y कंपनी!'. सध्यातरी या फ्रेंच वराची कल्पना जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. स्वत:च्या लग्नाच्या सुटचे रुपांतर त्याने पैसे कमवण्याची संधी आणि लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी केला. 

Web Title : दूल्हे ने शादी के लिए प्रायोजक ढूंढे, सूट को होर्डिंग बनाया।

Web Summary : फ्रांसीसी दूल्हे डागोबर्ट रेनोफ ने अपने सूट पर कंपनियों के लोगो लगाकर चतुराई से अपनी शादी को प्रायोजित किया। इस अभिनव दृष्टिकोण ने शादी के खर्चों को कवर किया, जिससे यह कार्यक्रम एक ब्रांडेड मामला बन गया, जिसने वैश्विक चर्चा और मिश्रित प्रतिक्रियाएं पैदा कीं।

Web Title : Groom finds sponsors for wedding, turns suit into billboard.

Web Summary : French groom Dagobert Renouf cleverly sponsored his wedding by displaying company logos on his suit. This innovative approach covered wedding expenses, turning the event into a branded affair, sparking global discussion and mixed reactions online.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.