Join us

नादच खुळा! सुपरबाईक घेऊन रस्त्यावर उतरल्या आजी; व्हायरल होतोय 'कूल आजीं'चा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:58 IST

Grandma With A Superbike : आजी बिंधास्त बाइक चालवत आहेत. त्यांचा कॉन्फिडन्स पाहण्यासारखा आहे.

सोशल मीडियावर रोज एकापेक्षा एक व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होतात. नुकताच सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये, एक आजी सुपरबाईकवर मस्त बाइक चालवताना दिसत आहे. हा फोटो खूप व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया यूजर्स या फोटोवर भरभरून कमेंट्स आणि प्रतिक्रिया देत आहेत. (When grandma came out on the road with a superbike there was a ruckus on social media) 

आजींचं वय काय हा प्रश्नच नाही, ॲटिट्यूड मात्र तरुण आहे. आजी बिंधास्त गाडी हाकत आहेत आणि स्टाइल अशी की देधडक बेधडक. आजी बाईक चालवत  पोज देत आहेत हे फोटोत दिसत आहे. लोकांना हा फोटो लोकांना खूप आवडला आहे. हा फोटो नवनीत सेकेराने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. Age is just a number. Incredible #MondayMotivation! असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे.

 या फोटोवर अनेकांच्या कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की आजींनी हेल्मेट घातले नाही, दुसरीकडे एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे - खरोखरच हृदयस्पर्शी चित्र. आजी या वयातही बाईक चालवतात. आपलं जगणं असं बिंधास्त असावं असं आजींकडे पाहून वाटतंच.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया