इडली हा दाक्षिणात्य पदार्थ आता भारतातल्या घराघरांमध्ये केला जातो. सकाळी नाश्त्याला इडली चटणी किंवा इडली सांबार दिला तरीही तो आवडीने खाल्ला जातो आणि रात्रीच्या जेवणात जरी इडली केली तरी इडली प्रेमी ती कधीच नाकारत नाही. म्हणजेच काय इडलीला नाही म्हणणारे खूपच कमी असतील.. आधी फक्त इडली चटणी आणि सांबार असं खाल्लं जायचं. पण आत मात्र काळानुसार इडलीही बदलत चालली असून खवय्यांसाठी ती बटन इडली, मसाला इडली, चायनिज इडली, शेजवान इडली, गार्लिक इडली अशा वेगवेगळ्या रुपांमध्येही मिळत आहे. एकंदरीतच काय इडली हा प्रकार आता भारतातच नाही तर जगभरात प्रचंड हिट झालेला आहे. याच इडलीची भुरळ आता गुगललाही पडली असून गुगलने इडलीचं एक मस्त डुडल तयार केलेलं आहे.(Google Doodle Idli)
गुगलने अतिशय रंजक पद्धतीने इडलीचं डुडल तयार केलं आहे. त्यामध्ये सुरुवातीला तांदूळ दाखवले आहेत. त्यानंतर त्याचं पीठ दाखवलं आहे. यानंतर इडली पात्रात भरलेलं पीठ, नंतर त्याच्या झालेल्या इडल्या, आपण इडली ज्या पदार्थांसोबत खातो ती इडली आणि नंतर एक इडली..
सर जो तेरा चकराए..‘या’ पद्धतीने घरी केलेल्या तेलाचं मालिश ५ मिनिटांत करते जादू, ५ फायदे-स्ट्रेस गायब
अशा पद्धतीने जणू काही इडलीची रेसिपीच गुगलने एका केळीच्या पानावर शेअर केली आहे आणि त्या स्टेपमध्ये "Google" हा शब्द दडलेला आहे. ३० मार्च हा दिवस खरंतर इडली डे म्हणून साजरा केला जातो. पण गुगलच्या पौष्टिक पदार्थांच्या सिरिजअंतर्गत हा इडली डुडल तयार करण्यात आला आहे.
आपण इडली हा मुळात दक्षिण भारतीय पदार्थ जरी समजत असलो, तरी इडली मुळची नेमकी कुठली याबाबत अनेक वाद आहेत. काही जणांच्या मते ती मुळची इंडोनेशियाची असून तिथल्या व्यापाऱ्यांमार्फत ती भारतात आली.
गर्भरेशमी पैठणीवर शिवण्यासाठी पाहा ७ लेटेस्ट ब्लाऊज डिझाइन्स-पैठणीचं ब्लाऊजही हवं देखणं आकर्षक
पण बहुसंख्य भारतीय या मताचे आहेत की इडली हा मुळात भारतीय पदार्थच असून तिचा उल्लेख अनेक जुन्या ग्रंथांमध्येही आहे. अशी ही इडली आज गुगल डुडल म्हणून झळकत असून तिच्याविषयी आज सगळीकडे नव्याने चर्चा सुरू झालेली आहे..