lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > Google Doodle : गुगलही झाले 'रोमँटिक'; बघा तुम्हाला जमतो का हा व्हॅलेंटाइन्स डे स्पेशल खेळ

Google Doodle : गुगलही झाले 'रोमँटिक'; बघा तुम्हाला जमतो का हा व्हॅलेंटाइन्स डे स्पेशल खेळ

Google Doodle : सगळे कपल्स एकमेकांना व्हॅलेंटाईन्सच्या शुभेच्छा देत असताना गुगलही मागे कसे असेल...एक अनोखा खेळ सादर करत गुगलने आपल्या युजर्सना अतिशय हटके शुभेच्छा दिल्या आहेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 12:21 PM2022-02-14T12:21:48+5:302022-02-14T12:48:10+5:30

Google Doodle : सगळे कपल्स एकमेकांना व्हॅलेंटाईन्सच्या शुभेच्छा देत असताना गुगलही मागे कसे असेल...एक अनोखा खेळ सादर करत गुगलने आपल्या युजर्सना अतिशय हटके शुभेच्छा दिल्या आहेत...

Google Doodle: Google also became 'romantic'; See if you like this Valentine's Day special game | Google Doodle : गुगलही झाले 'रोमँटिक'; बघा तुम्हाला जमतो का हा व्हॅलेंटाइन्स डे स्पेशल खेळ

Google Doodle : गुगलही झाले 'रोमँटिक'; बघा तुम्हाला जमतो का हा व्हॅलेंटाइन्स डे स्पेशल खेळ

Highlightsअशा आगळ्यावेगळ्या स्वरुपात शुभेच्छा देणारे गुगल कायम आपले वेगळे स्थान निर्माण करत असतेतुम्हीही पाहा ना गुगलचा हा खास खेळ खेळून, जमला तरच मिळतील शुभेच्छा...

जगभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाईन्स वीकमधील (Valentine's Week) आज सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे (Valentine's Day). तमाम कपल्ससाठी खास असणारा हा दिवस जास्त खास व्हावा यासाठी हॉटेल्स, वेगवेगळे रेस्टॉरंट, गिफ्ट देण्यासाठी बाजारातील कंपन्या एकाहून एक भन्नाट ऑफर्स देताना दिसतात. असे असताना गुगलही व्हॅलेंटाईन्सच्या शुभेच्छा देण्यात मागे कसे राहील? गुगल हा सध्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. काही ना काही गुगल केल्याशिवाय आपला दिवस संपत नाही. हेच लक्षात घेऊन गुगल कायम आपल्या युजर्ससाठी काही ना काही खास करत असते. आजच्या दिवसाचे निमित्त साधत गुगलनेही प्रेमी युगुलांकरिता खास डूडल (Google Doodle) तयार केले आहे. 

(Image : Google)
(Image : Google)

3 डी अंदाजात असलेल्या डूडल मध्ये एक गेम आहे. यात डूडलमध्ये असलेल्या लव्ह बर्ड्सना एकमेकांपर्यंत पोहचवण्याचं आव्हान देण्यात आलं आहे. तुम्ही प्ले बटणावर क्लिक करून हा खेळ खेळू शकता. त्यानंतर, स्क्रीनवर एक चक्रव्यूह दिसेल. Google चा लोगो पूर्ण होईपर्यंत लीव्हर आणि स्विचच्या मदतीने तुम्हांला दोन हॅमस्टरला पुन्हा एकत्र येण्यास मदत करायची आहे. पूर्ण झालेला लोगो दोन हॅमस्टर्सना एकमेकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक बोगदा म्हणून काम करणार आहे. हॅमस्टर पुन्हा एकत्र आल्यानंतर, स्क्रीनवर व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छांचा संदेश आपल्याला मिळणार आहे. 

आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने काहीतरी खास भेट द्या, त्यांना डेटवर घेऊन जा...इतकेच नाही तर त्यांच्यासाठी एखादा खास पदार्थ बनवा. आपण जोडीदारावर कायमच मनापासून प्रेम करत असलो तरी एक दिवस हे प्रेम व्यक्त करायला दिला तर बिघडते कुठे? एरवी आपली धावपळ, कामं सगळं चालूच असतं. मग अशाच एखाद्या खास दिवशी आपल्या खास व्यक्तीला शुभेच्छा देऊया की असा संदेश देणाऱ्या गुगलने शेवटच्या टप्प्यात हार्टच्या माध्यमातून व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलचा हा खेळ तुम्ही एकदा खेळून तर बघा...पाहा तुम्हाला जमतो का ते...जमला तरच मिळतील तुम्हाला गुगलकडून खास शुभेच्छा.


 

Web Title: Google Doodle: Google also became 'romantic'; See if you like this Valentine's Day special game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.