सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक मुलगा आणि मुलगी लग्नाच्या पोशाखात दिसत आहेत. या नवरा-नवरीचा फोटो लोकांना आवडला आहे. नवरदेव गोलू यादवची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातम्यांनुसार, गोलू यादव हा बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रहिवासी आहे.
सध्या गोलू यादव सोशल मीडियावर हिरो बनला आहे. यामागील कारण म्हणजे त्याने ट्रेनमध्ये भीक मागणाऱ्या एका अनाथ मुलीशी लग्न केल्याचं म्हटलं जात आहे. या लग्नामागे हृदयस्पर्शी गोष्ट आहे. गोलूने दिलेल्या माहितीनुसार, एक अनाथ मुलगी ट्रेनमध्ये भीक मागत होती आणि काही लोक तिच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहत होते. गोलूला हे पाहून खूप राग आला.
गोलूने मुलीला या वाईट लोकांपासून वाचवलं आणि तिला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या घरी आणलं. त्याने मुलीची त्याच्या पालकांशी ओळख करून दिली आणि नंतर आई-वडिलांच्या कुटुंबाच्या संमतीने पूर्ण आदराने तिच्यासोबत लग्न केलं. आता काही लोक यावरून जोरदार चर्चा करत आहेत. तर काहींनी गोलूचं भरभरून कौतुक केलं आहे.
